कर्जमाफी फेल, राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य हमीभाव मिळावा तसेच दुधाला प्रतिलिटर अनुदान मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली.

सरकारची कर्जमाफीची योजना फोल ठरली असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला नाही. बोगस कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीपाला व दुधाला योग्य दर मिळण्यासाठी लोकसभेत कायदा असावा म्हणून बिल तयार करण्यात आले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे बिल मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

.

Leave a Comment