इंडियन आर्मीच्या कर्नलचं प्रधानमंत्री मोदींना पत्र ..

(निवृत्त) कर्नल यतेंद्रकुमार यादव

ई-मेल: yatenkr@gmail.com                                     H.No. B २६०

     सेक्टर गॅमा

ग्रेटर नोएडा

     गौतम बुद्ध नगर

    पिन: २०१३१०

    १९ फेब्रुवारी,२०१९

प्रति

 

मा. पंतप्रधान

पंतप्रधान कार्यालय

साऊथ ब्लॉक, रायसिना हिल्स,

नवी दिल्ली-११००११

 

माननीय पंतप्रधान,

 

  1. दिनांक १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी आपल्या देशात काश्मीरमधील आजवरचा सर्वात भयंकर आत्मघाती अतिरेकी हल्ला , जो पाकिस्तानातील ISI नियंत्रित जैश ए मोहम्मद या संघटनेच्या स्थानिक अतिरेक्याने तब्बल २५०किलो स्फोटकं भरलेल्या स्कॉर्पिओ वाहनांची धडक जवानांच्या बसला देऊन केला गेला. यात ४२ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. साहजिकच अपेक्षेप्रमाणे देशभरात या अत्यंत निर्घृण हल्ल्याबद्दल अत्यंत तीव्र संतापाची लाट उसळली.
  2. प्राथमिक विश्लेषणातून हे लक्षात येते कि, जवानांच्या काफिल्याची वाहतूक सुरु असताना त्याच मार्गावरून त्याच वेळी नागरी वाहतूक सुरु ठेवण्याची परवानगी देणे हे अत्यंत घातक आणि जीवघेणे ठरले आहे. यावेळी मला ३ नोव्हेम्बर, २०१४ ची घटना आठवते जेव्हा काश्मीरमधील बडगाम येथे एका आर्मी चेक पॉईंट वरील जवानांना, तीन चेक पॉईंट्स वर थांबायला सांगूनही न थांबलेल्या एका भरधाव मारुती कार वर नाईलाजाने गोळीबार करावा लागला होता आणि त्यात दोन तरुण मुलांचा मृत्यू झाला होता.
  3. या प्रसंगानंतर घडलेल्या गोष्टींबद्दल बोलण्याआधी मला या संबंधातील काही महत्वाच्या विषयांबद्दल थोडक्यात बोलायचे आहे. पंतप्रधान जी, गेल्या काही दशकात जम्मू-काश्मीर हि एक युद्धभूमी बनली आहे हे वेगळ्याने सांगण्याची काही गरज नाही. तिथे असलेले अतिरेकी हे काही साधे सुधे गुन्हेगार नाहीत तर अत्यंत उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज आहेत. नेहेमीच अतिरेकी आणि जवान यांच्यातील चकमकींमध्ये हे लक्षात आलय कि जीव वाचण्याची शक्यता हि बऱ्याचदा पहिले कोण गोळी चालवतो यावर अवलंबून असतं. अशा परिस्थितींमध्ये जवानांजवळ विश्लेषण करत बसण्याचा अवधी नसतो. अशा परिस्थितीला परिणामकारकरीत्या हाताळता यावं यासाठी लष्कराने एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) बनवलेली आहे. बडगाम मधील चेक पोस्ट वरील जवान ३ नोव्हेंबर २०१४ रोजी त्या SOP चेच पालन करत होते.
  4. हा प्रसंग आणि नंतरच्या घटनांबद्दल तुम्हाला लिहिलेल्या माझ्या एका पत्रात मी लिहिले आहेच. दि. १३ फेब्रुवारी, २०१८ चे ते पत्रं मी सोबत जोडले आहेच. पण तरीही, तुमच्या सोयीसाठी मी त्यातील एक उतारा इथे पुन्हा लिहीत आहे. कोट “४. तरीही, बडगाम च्या घटनेबद्दल तुमची वैयक्तिक भूमिका जास्त चिंताजनक वाटते जी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांदरम्यान तुम्ही जाहीर व्यक्त केली. तुमच्या पक्षाच्या प्रचारादरम्यान एका जाहीर सभेत तुम्ही लष्कराच्या त्या जवानांवर केलेल्या कारवाईचे जाहीररीत्या श्रेय घेतले होते. लष्कराच्या मनोधैर्यावर त्याचा काय परिणाम होईल याची पर्वा न करता तुम्ही ते बोलला होता. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधानाने लष्करी जवानांवरील कारवाईचे श्रेय घेण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल.    
  5. वर म्हटल्याप्रमाणे, तेव्हा जम्मू-काश्मीर मधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु होता. साहजिकच, निवडणुकांच्या राजकारणासाठी आणि काश्मीरमधील जनतेला खुश करण्यासाठी लष्कराच्या Northern Command च्या मुख्य अधिकाऱ्याला त्या घटनेबद्दल जाहीररीत्या माफी मागायला भाग पाडलं गेलं होत. सोबत जोडलेल्या २७ नोव्हेम्बर, २०१४ च्या NDTV च्या रिपोर्टनुसार “जम्मू काश्मीर मधील सर्वोच्च दर्जावरील लष्करी अधिकाऱ्याला नवी दिल्लीतील राजकीय नेतृत्वाने त्या दोन तरुणांच्या घरी जाऊन माफी मागून नुकसानभरपाई देण्याबद्दल सांगितले गेले.” त्याच वृत्तात पुढे म्हटलं आहे कि “आजवरच्या सर्वात कमी वेळेत झालेल्या चौकशीनुसार (अर्थातच राजकीय दबावाखाली) त्या दोन तरुणांच्या मृत्यूबद्दल लष्कराने ९ जवानांना दोषी ठरवले आहे. ३ नोव्हेम्बर रोजी त्यांनी केलेल्या गोळीबारात हे दोन तरुण मृत्युमुखी पडले होते.”
  6. श्रीनगरमधील एका जाहीर सभेतील तुमच्याच एका भाषणावरून हे सुस्पष्ट होते कि हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं. तुमच्या त्या भाषणाची विडिओ क्लिप, जी NDTV वर दाखवली गेली होती, सध्या सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली आहे. तुमच्या सोयीसाठी तुमच्याच भाषणातील एक भाग मी इथे देत आहे. तुमच्या नेहेमीच्याच थाटात तुम्ही बोलला होतात कि “पहिली बार, तीस साल में पहिली बार, ये मोदी सरकार कि कमाल देखिये. पहिली बार सेना ने प्रेस कॉन्फरेन्स लेके कहां कि जो दो नौजवान मारे गये थे, ये सेना कि गलती थी … और सेना ने अपनी गलती मानी, inquiry commission बैठा और जीन लोगोने गोली चालावी थी उनपर केस दर्ज किया गया है… ये मेरे नेक इरादोका सबूत है भाईओ बहनो … तीस साल मी नही हुआ है… तीस साल नहीं हुआ है… और इसलिये काश्मीर के मेरे भाईओ बहनो मैं आपको न्याय दिलाने के लिए आया हूं..”
  7. तुम्ही अगदी खरं बोललात पंतप्रधान जी, जेव्हा तुम्ही म्हणालात कि “तीस साल में नहीं हुआ है….” कारण यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्याला त्याच्या जवानांनी केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे कर्तव्य बजावल्याबद्दल जाहीर रित्या माफी मागायला भाग पाडले नव्हते. यामुळे लष्करातील जवान निराश आणि अपमानित झाला. त्यांचं काहीही व्यक्तिगत वैर नव्हतं. गेली काही दशकं या अघोषित युद्धात, जवान रोज त्यांचं रक्त सांडत आहेत, प्राण अर्पण करत आहेत आणि ते फक्त या देशाची अखंडता कायम राहावी आणि देशाचा तिरंगा ध्वज उंच फडकत राहावा म्हणून. आत्ता मी हे पत्रं लिहीत असताना सर्वच माध्यमांवर पुलावामाचा बदला घेताना चार जवान आणि एक पोलीस कर्मचारी बळी पडल्याची बातमी येत आहे.
  8. हे वेगळ्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही कि आपल्या कृत्यांमुळे सैनिक अत्यंत निराश झाले आहेत. तरीही, तुमच्या कृत्यांचा दुर्दैवी दूरगामी परिणाम म्हणजे “वाहनावर बसवलेल Improvised explosive devise” हे आहे आणि त्यामुळे आज देश युद्धाच्या सीमेवर येऊन ठेपला आहे. मुफ्ती मोहमद सैद यांच्या सरकारच्या काळात लष्कराच्या काफिल्यांच्या वाहतुकीच्या वेळेच्या नियमात शिथिलता आली होती. बडगामच्या घटनेनंतर त्यात आणि चेक पोस्ट्स मध्ये अधिकच कमी केली गेली. मला हे स्पष्टपणे सांगण्यात काहीच हरकत वाटत नाही कि लष्कराच्या कारभारात राजकीय हस्तक्षेपामुळे पुलवामा सारखी घटना घडणारच होती. पंतप्रधानजी, जर आपली इच्छा असेल तर गेल्या काळातील घटनांच्या मालिकेचा विचार केलात तर त्याचे पडसाद आपल्याला पुलावामाच्या घटनेत दिसून येतील. जर आपली इच्छा असेल तर…

 

जय हिंद !

 

आपला नम्र,

 

कर्नल (निवृत्त) यतेंद्रकुमार यादव

 

प्रत :

 

१. निर्मला सीतारामन

संरक्षण मंत्री

 

२. जनरल बिपीन रावत     

.

Leave a Comment