गुजरात विधानसभेत बिबट्या शिरला

अहमदाबाद– गुजरात विधानसभेच्या परिसरात बिबट्या शिरला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये विधानसभेच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचे आढळले आहे त्यामुळे या परिसरात येण्यास लोकांना बंदी करण्यात आली आहे.

रविवारी रात्री उशीरा विधावसभा सचिवालयात बिबट्या शिरला आहे. वन विभाग आणि पोलिस यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी संयुक्त अभियान सुरु केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या परिसरात बिबट्या शिरल्याने प्रशासन खाडकन जागे झाले आहे.

या परिसरात मुख्यमंत्र्यासोबतच इतर मंत्र्यांचेही कार्यालय आहेत. 100 जाणांची टिम या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment