मोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत.

मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत, तरुणांना नोकर्या द्यायला सरकार सक्षम नाही त्यामुळे भारत चीनच्या तुलनेत अजून मागेच असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

“उत्पादनांच्या निर्यातीत चीन भारतापेक्षा पाचपट पुढे आहे, या उलट भारताच्या आयात निर्यातीत प्रचंड तुट आहे. भारतात गुंतवणूक करणाऱ्या व्यवसायांना अजून बराच संयम राखणे गरजेचं आहे.” असंही ते म्हणाले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment