राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

२०१५ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ ऍन्गस डेटॉन व फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पीकेटी हे राहुल गांधी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘कमीतकमी उत्पन्नाची हमी’ या योजनेच्या आराखडा निर्मितीमध्ये त्यांची मदत करत असल्याचे सामोर आले आहे.

येत्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त झाल्यास आपण “कमीतकमी उत्पन्नाची हमी” देणारी योजना प्रत्येक भारतीयासाठी लागू करणार असल्याचे कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. हि योजना कोणत्या पद्धतीने राबवता येईल? ती प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचू शकेल? यासाठी आराखडा निर्मितीचे काम सुरु करण्यात आले असून यामध्ये आंतराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ त्यांना मदत करत आहेत.


यामध्ये २०१५ चे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते ऍन्गस डेटॉन, फ्रान्स चे अर्थतज्ञ रॉबर्ट पीकेटी व मॅन्चेस्टस इन्स्टिट्यूट ऑफ़ टेकनॉलॉजी चे अभिजित बॅनर्जी कॉंग्रेस पक्षाला या योजनेच्या कामात मदत करत आहेत.
याबद्दल पिकेटी यांना विचारले असता, ‘या योजनेचे भारतात मोठ्या प्रमाणात स्वागत होणार असून या योजनेमुळे भारतातील श्रीमंत व गरीब दरी कमी होण्यास नक्कीच मदत होईल,’असे मत व्यक्त केले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment