पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टरची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने केले निलंबित

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोग सर्वांवर लक्ष ठेवून असते. मात्र निवडणूक आयोगाने एखा आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. मोहम्मद मोहसिन असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते कर्नाटकमधील १९९६च्या बॅचचे आहेत. मोहसिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना निलंबित केल्याचे वृत्तच समोर आले आहे.

मोहसिन यांनी ओडिसा राज्यात संबलपूर येथे इलेक्शन जनरल निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ओडिसामध्ये मंगळवारी दौैरा होता. तेव्हा या दौऱ्यात मोहसिन यांनी पंतप्रधानांच्या ताफ्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मोहसिन यांच्या या निर्णयावर पंतप्रधान कार्यालय नाराज झाले आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मग निवडणूक आयोगाचे एक पथक या घटनेची चौकशी करण्यासाठी ओडिसामध्ये दाखल झाले. त्यांनतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्व चौकशी केली आणि निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून मोहम्मद मोहसिन यांना निलंबित केले.

दरम्यान, ओडिसा सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संबंधी माहिती दिल्याचे  ‘जनसत्ता डॉट कॉम’ने सांगितले आहे. यात मोहसिन यांच्याकडे फक्त निवडणूक निरिक्षक म्हणून जबाबदारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेत भाषण करत असताना, मोहसिन हे त्यांच्या हेलिकॉप्टरजवळ गेले. तेथे त्यांनी उपस्थित असलेल्या एसपीजीकडे काही चौकशी केली. तसंच आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे पुढीलकार्यक्रमासाठी मोदींना २० मिनिटे उशीर झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितलं. तसंच मोहसिन यांना जनरल निरिक्षक म्हणून निवडणूक आयोगाचे काम पाहणे आणि निवडणूक आयोगाला अहवाल-माहिती देणे ही काम करतात. त्यांना मोदींच्या ताफ्याची चौकशी किंवा तपासणी करण्याचे कोणतेही अधिकार नसतात, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment