काँग्रेस राष्ट्रवादीला हरवण्यासाठी अख्खी गुजरात भाजप महाराष्ट्रात

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ आली असताना भारतीय जनता पक्षाने गुजरात राज्यातील जवळपास 10,000 कार्यकर्ते व पदाधिकारी महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरातमधील जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांपासून प्रदेश पातळीवरील सर्वच पदाधिकारी अमित शहा व जे पी नड्डा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात येणार आहेत, महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना ते निवडणुकीच्या कामात मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बूथ व्यवस्थापन, प्रचार यंत्रणा आणि मीडिया सांभाळण्यासाठी हे अतिरिक्त मनुष्यबळ पक्षाने बोलावले असल्याची शक्यता आहे.

.

Leave a Comment