जगजीत सिंह यांच्यामुळे प्लेन लँडिंगसाठी झाला अर्धा तास उशीर

जगजीत सिंह यांचा चाहता वर्ग जगभर पसरलेला आहे . त्यांच्या गायकीने भारतीयांच्या हृदयावर अनेक दशकं अधिराज्य गाजवले. जगजीत सिंह यांच्या गझलांमध्ये आजही आपण रमतो.काल जगजीत सिंग यांची पुण्यतिथी होती. जगजीत सिंह यांचा आयुष्यात अनेक कमालीचे किस्से घडले आहेत. त्यातलेच हे दोन किस्से

पहिला, जगजीत सिंह जेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होते तेव्हा त्यांच्या सोबत कोणालाच राहावेसे वाटतं नसे. याचे कारण असे की, जगजीतजी रोज पहाटे उठून गाण्याचा रियाज करत असत आणि त्यामुळे सगळ्यांची सकाळी झोपमोड होत असे. आत्ता सकाळच्या साखर झोपेत कोणाला शास्त्रीय गायनातल्या हरकती ऐकू वाटतील? त्यामुळेच त्यांचा कोणताही रूममेट पंधरा दिवसांपेक्षा जास्ती दिवस टिकत नसे. शेवटी जगजीतजींना वॉर्डनने एक सिंगल रूम देऊ केली.

दुसरा, जगजीत सिंह यांचा सगळ्यात मजेदार आणि प्रसिद्ध किस्सा म्हणजे, एकेदिवशी जगजीत सिंह विमानाने कराची वरून दिल्लीला प्रवास करत होते तेव्हाचा. जगजीतजींच्या सोबतच्या प्रवाशांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या काही गजल सगळ्यांसाठी गाव्यात. जगजीत सिंह यांनी होकार दिल्या नंतर गजलांची मैफिल सुरु झाली. या आवाजाच्या जादूगाराच्या गजलांमध्ये पायलट सहित सर्वजण तल्लीन झाले. विमानाच्या पायलट ने तर कंट्रोल रूमला संपर्क साधून सांगितले की, विमानला उतरायला उशीर होईल. त्यानंतर अजून अर्धा तास जगजीत सिंह यांनी त्यांच्या अनेक गजल प्रवाशांना ऐकवल्या. तोवर विमान मुंबई एअरपोर्टला घिरक्या घालत होतं. एअरपोर्ट वर विमानात काही बिघाड झाला का काही या विचारात लोक होते. इकडं विमानात मात्र सर्वजण गजल ऐकत होते.

या कारणामुळे विमानाला लँड व्हायला अर्धा तास उशीर झाला. हा असा क्षण क्वचितच एखाद्या गायकाच्या आयुष्यात आला असेल.

.

Leave a Comment