एकांगी पत्रकारितेला तडाखा, अर्णब गोस्वामीवर FIR दाखल करण्याचे आदेश…

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात गोपनीय कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केल्याने रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात न्यायालयाने पोलिसांना FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शशी थरूर यांनी त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्युसंबंधित पोलीस तपासणीतील गोपनीय कागदपत्रे प्रसारमाध्यामांसमोर आणल्याप्रकरणी तसेच, त्यांच्यावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करून विनापरवानगी त्यांचा ई-मेल संदेश वापरल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर निकाल देताना दिल्ली न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

अर्णब गोस्वामी नी पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात, थरूर यांच्यावर निष्कामी व बिनबुडाचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, लोकांमधील थरूर यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी तसेच, आपल्या टीव्ही चा TRP या प्रकरणाद्वारे वाढवण्यासाठीदेखील अर्णब यांनी थरूर यांच्यावर त्यांच्या टीव्ही चनेल द्वारे आरोप केले होते.

याबद्दल विजय चोरमारे यांना विचारले असता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्याचा वापर कसा व कुठे करावा हे ठरवल पाहिजे. अर्णब गोस्वामी हे एक प्रत्रकार आहेत व त्यांनी आपल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर सुरुवातीपासूनच या प्रकरणात शोध घेण्यासाठी न करता तो एखाद्या व्यक्तीला लक्ष करून त्याची मानहानी करण्यासाठी केलेला दिसून येतो. शोधपत्रकरिता करत असताना आपल्या अभिव्यक्तीचा योग्य वापर हा प्रत्येक पत्रकाराने केला पाहिजे. याचबरोबर, अर्णब गोस्वामी यांनी पोलीस तपासणीतील गोपनीय कागदपत्रे प्रसार माध्यमात खुली केली, पोलिसांच्या म्हणण्यानुसार हि कागदपत्रे चोरण्यात आलेली आहेत, याबद्दल पुढील चौकशी व्हावी, व पत्रकारितेच्या क्षेत्रात अशी प्रकरणे घडू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुनंदा पुष्कर या जाने.२०१४ मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. यानंतर त्यांचे पती व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यावर आरोप करण्यात आले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment