शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य : अमर्त्य सेन

बंगळुरू : शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं चुकीचं नाही. बाकीच्या अर्थतज्ज्ञांना वाटत असेल पण कर्जमाफीत मला काहीही चुकीचं वाटत नाही. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली येऊन त्यांची जमीन विकावी लागते, इतर उद्योगांना जसं कर्ज मिळते आणि कर्जमाफीहि मिळते तशी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असे मत नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले.

सरकारी धोरण किंवा इतर कारणांमुळे शेतकरी त्यांच्या शेतातून पुरेसं उत्पन्न काढू शकत नसतील तर त्यात त्यांचा दोष नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर त्यांना त्याची लालूच लागेल असे जे म्हणतात त्यांनी सरकारच्या इतर धोरणांचाही विचार करावा. प्रोग्रेसिव्ह करप्रणालीतहि प्रलोभानाची तरतूद आहे मग आपण ते सुद्धा बंद करणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इन्फोसिस फौंडेशन द्वारे दरवर्षी वैज्ञानिक, अर्थतज्ञ व कलावंतांचा सन्मान केला जातो या कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये अशी मतं बर्याच अर्थतज्ञांनी व्यक्त केली होती, रघुराम राजन, एसबीआयच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनीही कर्जमाफी विरोधात मत व्यक्त केलं होतं. या चर्चांना या विधानाने पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment