”भाजपला मतदान करू नका”, म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या

डेहरादून : देशात सर्वाधिक महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय शेतकऱ्यांची आत्महत्या हा आहे. त्यासाठी मोदी सरकार रोज नवनव्या योजना आणत आहे. मात्र उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोटमध्ये “भाजपला मतदान करू नका”, असं आवाहन केले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ईश्वरचंद्र शर्मा असे आहे. ते ६५ वर्षांचे होते. मंगळवारी पाहटे विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली.
हरिद्वार जिल्ह्यातील दडकी गावातील ते रहिवासी होते. त्यांनी विष घेतल्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होतीय.
भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना उद्धवस्त केलं आहे. त्यामुळे भाजपाला मतदान करू नका, अन्यथा ते प्रत्येकाला चहा विकायला लावतील, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहीलं आहे.
शर्मा यांना शेतीसाठी कर्ज हवे होते. त्यासाठी एका मध्यस्थी माणसाने कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केली. मात्र, त्याचा मोबदल्यात त्याने शर्मा यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करायचं असल्याने ४ लाख रुपयांची मागणी या दलालाने केली होती. शर्मा यांना ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, मात्र हे पैसे त्या दलालानेच हडप केले. शर्मा यांच्याकडून त्याने ब्लँक चेक सही करून घेतला होता. त्यामुळे कर्जाची रक्कम शर्मा यांच्या अकाऊंटमध्ये जमा होताच, त्याने ती रक्कम काढून घेतली, असं या नोटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, एका शेतकऱ्याने आत्महत्या करणे हे खरंच चिंताजनक आहे. मात्र त्यांनी लिहीलेल्या सुसाईड नोटवरून डेहरादून काँग्रेसने याप्रकरणी भाजपला दोषी ठरवले आहे. पोलीस या सुसाईड नोटची खातरजमा करून घेत आहेत.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment