भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचुक, आंतरराष्ट्रीय पातळीवर होतोय गौरव

संयुक्तराष्ट्र : देशातील हवामान खात्याच्या अहवालावर कधीच कोणीही विश्वास ठेवत नाही. कारण बहुदा त्यांनी दिलेले अंदाज चुकत असतात. त्यामुळे भारतीय हवामान खाते नेहमीच ट्रोल होत असते. भारतात जरी कौतुक झाले नसले तरी भारतीय हवामान खात्याचे अंतरराष्ट्रय स्तरावर कौतुक होत आहे. भारतीय हवामान खात्याने फानी चक्रीवादळासंदर्भात अंदाज वर्तवला होता. तो अगदी तंतोतंत बरोबर ठरला आहे, त्यामुळे UN ने भारतीय हवामान खात्याचे कौतुक करत गौरव केला आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत तसंच अगदी बरोबर दिल्याने अनेक लोकांचे प्राण वाचवता आले, असं राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.
दिलेले अंदाज चुकतात म्हणून ट्रोल होणाऱ्या हवामान खात्याने फानी चक्रीवादळाबाबत अगदी योग्य अंदाज वर्तवले. हे वादळ जमिनीवर नेमकं कुठे, किती वाजता धडकणार याची माहिती दिली होती. तसंच या वादळाची तीव्रता काय असेल याचाही अंदाज त्यांनी योग्य वर्तवला होता. या अंदाजानुसार कारवाई करत सुमारे १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तसंच सतर्कता घेत रेल्वे, विमान सेवेसह ठरावीक वाहतूक सेवा बदल करत बंद करण्यात आले. त्यामुळे आर्थिक नुकसानालाही आळा घालता आला.
हे वादळ गेल्या २० वर्षांतले सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. या वादळाने ओदिशाच्या किनाऱ्याला थैमान घातले आहे. त्यामुळे तेथील जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत यावादळात १० जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजामुळे मोठी जिवीत हानी टळली आहे.
झीरो कॅज्युल्टी सायक्लॉन प्रेडिक्शन पॉलिसी अर्थात जीवितहानी पूर्ण टाळणारा हवामानाचा अंदाज याबद्दल २०१५ मध्ये एक आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार भारताने वेळेवर आणि सुयोग्य पद्धतीने उपाययोजना आखत या वादळामुळे होणारी हानी कमी करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या हवामान खात्याचा गौरव होत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment