निवडणूक आयोगाचा ‘हा’ निर्णय त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच!

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात पश्चिम बंगालमधील वातावरण गंभीर झाले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूकांच्या प्रचाराला हिंसेचे वळण लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आयोगाने दिलेल्या वेळेवरून काँग्रेसवर टीका केली आहे. कारण आयोगाने दि. १६ प्रचार बंद करण्याचा निर्णय घेताला आहे मात्र वेळ ही रात्री १० ची ठेवली आहे. त्यावरून निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोग भाजपच्या मुख्यालयातून आदेश घेत आहे का?, असा सवाल केला आहे.

आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस अगोदर प्रचार थांबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला, पण त्यासाठी आज (ता.१६) रात्री १० ची वेळ निवडली. पीएम मोदींच्या आज बंगालमध्ये दोन सभा आहेत. यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाला प्रचारबंदी करायचीच होती, तर आज सकाळपासूनच का केली नाही?, रात्री १० नंतरच का?, असा सवाल उपस्थित होत आहे. मोदींच्या सभा पार पडल्यानंतर ही प्रचारबंदी लागू होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्यणावरून त्यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणूक आयोगाचा आदेश म्हणजे पीएम मोदींच्या पुर्वनियोजित सभा बाधित होऊ नयेत यासाठी त्यांना दिलेले गिफ्टच आहे, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला आहे. तसंच देशातील प्रत्येक नागरिक घटनात्मक संस्थेच्या स्वतंत्रता आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, असंही त्यांनी नमूद केले

.

Leave a Comment