महत्वाचा प्रश्न : “गरिबी हटाव” म्हणणाऱ्या कॉंग्रेसने गरिबी हटवली का ?

नवी दिल्ली : आम्ही सत्तेवर आल्यावर प्रत्येक गरिबाला न्यूनतम कमाईची हमी देऊ असं विधान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी केल्याबरोबर सोशल मिडीयावर विविध प्रतिक्रियांचा महापूर आला. काही सकारात्मक तर काही टीकात्मक प्रतिक्रिया आल्या, मात्र सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारण्यात आला तो इंदिरा गांधींच्या गरिबी हटाव या घोषणेबद्दल.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ सालच्या आपल्या निवडणूक मोहिमेत गरिबी हटाव हि घोषणा दिली, तेव्हापासून हा प्रश्न चिरंजीव अश्वथाम्यासारखा भारतीय राजकारणात फिरतो आहे. कॉंग्रेसने गरिबी हटवली का असा प्रश्न सतत विचारल्या जात असला तरी याला उत्तर कॉंग्रेस पक्षाच्या निवडणूक घोषणामधून मिळणार नाही. या प्रश्नाचं खरं प्रामाणिक उत्तर आपल्याला statistics अर्थात आकडेवारीच्या च्या माध्यमातून मिळवावे लागेल, तेही अधिकृत आकडेवारीतून ..

ऑक्सफोर्ड विद्यापिठाचा ऑक्सफोर्ड पॉलीसी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह नावाने एक कार्यक्रम आहे, त्यांनी गरिबीच्या निष्पक्ष मूल्यमापनासाठी मल्टी डायमेंशनल पॉव्हर्टि इंडेक्स MDPI या नावाने एक नविन पद्धत शोधून काढली आहे. ह्या पद्धतीने त्यांनी जगातल्या 105 देशातील गरिबीचे मूल्यमापन केले आहे. अत्यंत हलाखीचे आयुष्य जगणाऱ्या गरिबाला शिक्षण, आरोग्य, पोषण व वर्षातले किती दिवस हक्काचा रोजगार मिळतो यावरून देशातील गरीबीचे मूल्यमापन या पद्धतीने केले जाते. उत्पन्नाची एक पातळी ठरवून दरवर्षी किती जण गरिबीच्या बाहेर आले याचेही मूल्यमापन केले जाते.

2005 ते 2015 या काळात या MDPI नुसार भारतातील 270 दशलक्ष लोक हे गरिबीच्या बाहेर आले आहेत. दरडोई जीडीपीमध्ये 38,750 रुपयांपासून 88,746 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 2005 साली MDPI नुसार 55% भारतीय गरिबीच्या व्याख्येत बसत होते. 2015 साली 55 टक्क्यांपैकी 27% टक्के लोक गरिबीच्या बाहेर आले होते. म्हणजे २००५ ते २०१५ च्या काळात जवळपास 50% लोक गरिबीच्या बाहेर आले आहेत.

मनरेगा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान या सरकारी कार्यक्रमांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात फरक पडला असल्याचे या रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment