दिल्ली मेट्रोने १३००० झाडे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं?

 

मेट्रो ही गजबजलेल्या महानगरांमध्ये ट्रॅफिकची अडचण सोडवण्यासाठी बनवण्यात येते. या शहरांमधील दाट लोकवस्तीमुळे शहराचे हवामान व प्रदूषण संतुलित ठेवण्यासाठी झाडांची संख्या महत्वाची ठरते.
सध्या होऊ घातलेल्या मुंबई मेट्रोचे पडसाद झाडांच्या संख्येवर पडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुंबईतील आरे जंगलचा समावेश झाला आहे.

ज्या आरे जंगलाला मुंबईचा श्वास म्हटले जाते त्या जंगलाचे MMRCL (Mumbai Metro Rail Corporation Limited) ने रातोरात २१४१ झाडे मेट्रो कन्स्ट्रक्शनसाठी कापली.

 

अशाच काही समस्यांना DMCL (Delhi Metro Rail Corporation) ला सामोरे जावे लागले. दिल्ली मेट्रो विभागाला मेट्रोच्या फेज १ ते फेज ३ पर्यंतच्या कामासाठी सरकारकडून ५६,३०७ झाडे कापण्याची अनुमती दिली गेली होती.

DMCL ला फेज १ मध्ये १४,५०५ झाडे कापण्याची अनुमती होती तर त्यांनी त्यापैकी १३,८५८ झाडे कापली, फेज २ मध्ये २४,४५३ झाडे कापण्याची अनुमती होती तर त्यापैकी १७,९९७ झाडे कापली आणि फेज ३ मध्ये १७,३४९ झाडे कापण्याची अनुमती होती तर त्यापैकी DMCL ने ११,८७२ झाडे कापली आणि अशा रितीने, दिल्ली मेट्रो विभागाने अत्यंत हुशारीने आणि कुशलतेने ५६,३०७ पैकी १२,५८० झाडांना कापण्यापासून वाचवले.

दिल्ली मेट्रोने जास्तीत जास्त झाडे कापण्यापासून वाचवलीच पण त्यासोबतच फेज १ च्या दरम्यान दिल्ली मेट्रोला डेपो ची निर्मिती करताना त्यांनी जवळील मुख्य स्मारके आणि क्लोज लैण्ड ला देखील तुटण्यापासून वाचवले.

फेज १ चे काम चालू असताना दिल्ली मेट्रोला भूमिगत कॉरिडॉरसाठी डेपो तयार करायचा होता त्यासाठी त्यांना पूर्ण जागा सपाट करून, लँडफिल वेस्ट काढून त्या जागेवर ताजी माती टाकून ती जागा बदलली.

DMCL ला कापलेल्या एक-एक झाडामागे दिल्ली वन विभागाला भरपाई द्यावी लागते. या भरपाईचा रकमेचा उपयोग वृक्षरोपणामध्ये केला जातो.

का कापलेल्या झाडाच्या रकमेच्या मागे १० झाडांचे वृक्षरोपण केले जाते. अशाप्रकारे DMCL च्या देखरेखीखाली वन विभागाने एकूण ५,३५,१५० झाडे आतापर्यंत लावली आहेत.

दिल्लीतील मेट्रो च्या कामाबाबतीत DMCL च्या अधिकारण्यांना प्रश्न विचारता त्यांचे म्हणणे असे आले कि, ” कोणताही प्रोजेक्ट सुरु करायचा वेळी पर्यावरणाच्या प्रभावाचे आकलन करणे आवश्यक असते. आम्ही DPR नुसार काम सुरु करतो तेव्हा आम्ही जमिनीवर काही समायोजन करू शकतो. जेव्हा आम्हाला वाटते कि एक झाड मेट्रोच्या ट्रॅकमध्ये येत नाही तर ते झाड आम्ही कापण्यापासून वाचवू शकतो तर ते आम्ही तसं नक्की करतो परंतु, काही गोष्टींमध्ये हि संभावना कमी असते तेव्हा मात्र झाड कापण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय नसतो.”

DMCL चे प्रवक्ता अनुज दयाल यांनी असे सांगितले आहे कि, “DMCL ने झाडे वाढवण्यासाठी काही प्रयोग सुरु केले आहेत. मेट्रोच्या कामामध्ये जी झाडे कापली जातात तर ती कापली जाऊ नये यासाठी मेट्रो ट्रॅकपासून ५ किमी त्रिज्येत झाडे लावावी जेणेकरून त्या झाडाची जगण्याची शक्यता वाढते. तसेच वृक्षारोपण मध्ये एका झाडाला मुळासकट उपटून दुसऱ्या जागी स्थलांतरित केले जाऊ शकते.”विकास हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा घटक आहेच परंतु, आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन ही तितकाच महत्वाचा आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महण्याप्रमाणे जर आरे मधील कापलेल्या झाडांच्या बदल्यात मुंबई पासून दूरवरील अंतरावर तितकीच झाडं लावलीत तर त्याचा उपयोग शहराला होणार नाहीच. पण त्यासोबतच मुबईचे पर्यावरण संतुलन बिघडेल. जर हीच झाडे त्या शहरातच दुपटीने लावली तर त्या शहराचे पर्यावरण संतुलित राहील.

.

Leave a Comment