भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे चीनकडून स्वागत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे चीनकडून स्वागत

नवी दिल्ली : चीनने आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी पालनाबाबत झालेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच दोन्ही देश दोघांमध्ये असलेल्या मतभेदांचे योग्यरित्या निराकरण करतील अशी आशा व्यक्त केली आहे. दोन्ही देशामध्ये २००३ साली शस्त्रसंधी करार झाला होता. त्यासंबंधी २९ मे रोजी दोन्ही देशाच्या महासंचालकामध्ये हाँटलाईनव्दारे भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांबद्दल  दोन्ही देशांच्या शस्त्रसंधी पालनाबाबत सहमतीवर चर्चा करण्यात आली होती. तसेच २००३ च्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्याबाबत आणि यापुढे शस्त्रसंधीचे उल्लंघन टाळण्यासंबंधीही भारत आणि पाकिस्तान सहमत…

पुढे वाचा ..

का होत आहेत योगी आदित्यनाथ ट्रोल ?

का होत आहेत योगी आदित्यनाथ ट्रोल ?

उत्तर प्रदेशातील कैराना पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला, त्यात भाजपचा दणदणीत पराभव झाला आहे. मात्र या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयावर ट्रोल होत आहेत. “भाजपने कैराना निवडणूक हरल्यास मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले होते, आता भाजपच्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा द्यावा” असे वक्तव्य जिंकलेल्या उमेदवार तबस्सुम हुसेन यांनी केले आहे. याच वक्तव्याचा आधार घेऊन आता योगी आदित्यनाथ यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात येत आहे.

पुढे वाचा ..

असे आहेत पोटनिवडणुकींचे निकाल, भाजपची जोरदार पीछेहाट

असे आहेत पोटनिवडणुकींचे निकाल, भाजपची जोरदार पीछेहाट

नवी दिल्ली :  देशातील महाराष्ट्रासह विविध राज्यात एकूण १४ ठिकाणी  पोटनिवडणुकीचे निकाल जाहिर होणार होते.  आतापर्यत (दुपारी २.२२ वाजेपर्यत )१४ पैकी १२ जागांचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ दोन ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रातील पालघर आणि  उत्तराखंडातील थराली याठिकाणीच  विजय मिळविता आला आहे. –      महाराष्ट्रात आज पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर होणार होते. पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा सुमारे तीस हजार मतांनी पराभव…

पुढे वाचा ..

सहकाऱ्याचे निधन होऊनही मुख्यमंत्री उद्घाटनात मश्गुल, भावनाशुन्यतेची चर्चा..

सहकाऱ्याचे निधन होऊनही मुख्यमंत्री उद्घाटनात मश्गुल, भावनाशुन्यतेची चर्चा..

राज्याचे कृषिमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे निधन होऊन आता काही तासच उलटले असताना मुख्यमंत्री मात्र उद्घाटने व भेटी गाठींच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सहसा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याचे निधन झाले असल्यास शासकीय स्तरावर दुखावटा पाळल्या जातो, अशावेळेस अतिमहत्वाच्या बैठका सोडून इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा प्रघात आहे. आज सकाळी मुख्यमंत्री तंबाखू विरोधी दिन व ई-व्हेइकल्सच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार होते, मात्र सकाळी साडे चार वाजता कृषीमंत्र्यांचे निधन झाल्याचे समजताच…

पुढे वाचा ..

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर ( वय ६७ वर्षे) यांचे आज पहाटे (गुरूवार) ह्रदय विकाराराच्या झटक्याने निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी मुंबईतील सोमय्या रूग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आल होत. मात्र पहाटे ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फुंडकर यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत….

पुढे वाचा ..

कर्नाटकात कॉंग्रेसचा अजून एक आमदार वाढला.

कर्नाटकात कॉंग्रेसचा अजून एक आमदार वाढला.

बनावट मतदान कार्ड सापडल्याने निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवलेल्या राजराजेश्वरी नगर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. कॉंग्रेस पक्षाचे एन. मुनिरत्न येथून विजयी झाले आहेत. कॉंग्रेस, भाजपा व जेडीएस अशा तिहेरी लढतीत २५४०० मतांची आघाडी घेऊन कॉंग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. 

पुढे वाचा ..

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांबद्दल  दोन्ही देशांच्या (DGMO) महासंचालकामध्ये आज संपर्क साधला गेला. यावेळी दोन्ही देशात शस्त्रसंधी पालनाबाबत सहमती झाली आहे. हा संपर्क पाकिस्तानच्या महासंचालकाकडून काल सायंंकाळी ६ वाजता साधला गेला. भारताचे महासंचालक (डीजीएमओ) अनिल चौहाण आणि पाकिस्तानचे महासंचालक (डीजीएमओ) साहिर मिर्झा यामध्ये शस्त्रसंधी पालनाबाबत चर्चा झाली.

पुढे वाचा ..

प्रवीण तोगडीया पुन्हा अॅक्टीव्ह, हिंदुत्वासाठी नवीन पक्ष स्थापणार

प्रवीण तोगडीया पुन्हा अॅक्टीव्ह, हिंदुत्वासाठी नवीन पक्ष स्थापणार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभर फिरून एकेकाळी वातावरण तयार करणारे विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे आता एक नवा पक्ष स्थापन करणार असून त्या पक्षाचे नाव लवकरच घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त स्वप्ने दाखवून विकास होत नसतो, त्यासाठी कामही करावे लागते, मोदि सरकारच्या कामाला मी उणे २५% गुण देतो, देशात मोदींचंं सरकार आलं पण यात सामान्य माणसाचं काहीच भलं झालेलं नाही. प्रवीण तोगडिया  कलम ३७० रद्द करावं, अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कायदा करावा या मागण्यांसाठी मी…

पुढे वाचा ..

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

मुंबई: सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे, २०१९ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रमजान महिन्यात यंदा आरएसएस सुद्धा इफ्तार पार्टी देणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातली मुस्लीम राष्ट्रीय मंच हि संघटना ६ जूनला सरकारी मालकीच्या सह्याद्री अतिथीगृहात हि इफ्तार पार्टी देत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुस्लीम देशांचे प्रतिनिधी सुद्धा हजार राहणार आहेत. संघ परिवारातील संघटना इतर पक्षांच्या नेत्यांवर इफ्तार पार्टीत भाग घेतल्याच्या मुद्द्यावरून सतत टीका करत असताना संघाने यावर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेले हे…

पुढे वाचा ..

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

पेट्रोलचे दर रोज नवनवीन उच्चांक गाठत असताना मोदि सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत चक्क एका पैशाची घसघशीत कपात केली आहे. याआधी पेट्रोलियम कंपनीच्या वेबसाईटवर ६० पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याचे दाखवत होते. मात्र कंपनीने हि चूक सुधारत लगेच हि कपात साठ पैशांची नाही तर एक पैशाची आहे असे स्पष्ट केले. सध्या पेट्रोलची सरकारला पडणारी किंमत हि ४१ रुपयांच्या आसपास आहे मात्र पेट्रोलवर तब्बल ११०% टॅक्स सरकार गोळा करत असल्याने पेट्रोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे….

पुढे वाचा ..
1 22 23 24 25 26 29