सहकाऱ्याचे निधन होऊनही मुख्यमंत्री उद्घाटनात मश्गुल, भावनाशुन्यतेची चर्चा..

सहकाऱ्याचे निधन होऊनही मुख्यमंत्री उद्घाटनात मश्गुल, भावनाशुन्यतेची चर्चा..

राज्याचे कृषिमंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे निधन होऊन आता काही तासच उलटले असताना मुख्यमंत्री मात्र उद्घाटने व भेटी गाठींच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. सहसा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याचे निधन झाले असल्यास शासकीय स्तरावर दुखावटा पाळल्या जातो, अशावेळेस अतिमहत्वाच्या बैठका सोडून इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा प्रघात आहे. आज सकाळी मुख्यमंत्री तंबाखू विरोधी दिन व ई-व्हेइकल्सच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार होते, मात्र सकाळी साडे चार वाजता कृषीमंत्र्यांचे निधन झाल्याचे समजताच…

पुढे वाचा ..

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर ( वय ६७ वर्षे) यांचे आज पहाटे (गुरूवार) ह्रदय विकाराराच्या झटक्याने निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी मुंबईतील सोमय्या रूग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आल होत. मात्र पहाटे ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फुंडकर यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत….

पुढे वाचा ..

कर्नाटकात कॉंग्रेसचा अजून एक आमदार वाढला.

कर्नाटकात कॉंग्रेसचा अजून एक आमदार वाढला.

बनावट मतदान कार्ड सापडल्याने निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवलेल्या राजराजेश्वरी नगर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. कॉंग्रेस पक्षाचे एन. मुनिरत्न येथून विजयी झाले आहेत. कॉंग्रेस, भाजपा व जेडीएस अशा तिहेरी लढतीत २५४०० मतांची आघाडी घेऊन कॉंग्रेस उमेदवार निवडून आले आहेत. 

पुढे वाचा ..

रजनीकांतचा काला चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल, चित्रपटावर कर्नाटकमध्ये बंदी

रजनीकांतचा काला चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल, चित्रपटावर कर्नाटकमध्ये बंदी

नवी दिल्ली :  रजनीकांतच्या काला या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. आणि रिलीज होताच या चित्रपटाच्या ट्रेलरला एका दिवसात ४ मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत.  काला हा चित्रपट ७ जूनला प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत ने चित्रपटामध्ये ‘किंग आँफ धारावी’ म्हणजेच भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारा नायक अशी भूमिका साकारत आहे. धारावीला वाचविण्यासाठी रजनीकांत लढत आहे. तर नाना पाटेकर आणि हूमा कुरेशी या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. नाना पाटेकर एका मोठ्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत.  काला मध्ये समुथिरकानी, अंजली पाटील, शिवाजी शिंदे, पंकज त्रिपाठी…

पुढे वाचा ..

पेट्रोलच्या दरकपातीचा खाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, बँकेत गर्दी वाढली

पेट्रोलच्या दरकपातीचा खाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, बँकेत गर्दी वाढली

दिल्ली : पेट्रोल व डिझेलवर सरकारने घसघशीत एका पैशाची दरकपात केल्यावर उत्साहित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी मोदिंनी घेतलेल्या या निर्णयाचा जनमानसात प्रचार करण्याचे आदेश पक्षाकडून आल्याचे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष नेहमीच गोरगरिबांचा विचार करतो, कर्नाटकातल्या गरीब आमदारांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून आम्ही “दीदा उपाध्याय आमदार खरेदी योजना” तिथे लागू केली होती मात्र विघ्नसंतोषी कॉंग्रेसने ती हाणून पाडली. मात्र “न खाऊंंगा, न खाणे दुंगा, लेकीन पार्सल लेके जाने दुंगा” या आमच्या…

पुढे वाचा ..

विजय माल्यावर निघणार चित्रपट, पहलाज निहलानी दिग्दर्शक तर गोविंदा प्रमुख भूमिकेत..

विजय माल्यावर निघणार चित्रपट, पहलाज निहलानी दिग्दर्शक तर गोविंदा प्रमुख भूमिकेत..

नवी दिल्ली : पहलाज निहलानी आणि सुपस्टार गोविंदा याची जोडी नेहमीच सुपरहिट राहिली आहे.  अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सेंटर बोर्ड आँफ फिल्म सर्टिफेकेशनचे पूर्व अध्यक्ष पहलाज निहलानी त्यांच्या आवडत्या अभिनेत्यासोबत चित्रपट बनवणार आहेत. पण यावेळेस गोविंदा भारतातील सर्वात मोठा घोटाळेबाज विजय माल्या यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट हा विजय माल्याच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचे नाव ‘रंगीला राजा’ असे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटांची शुटिंग सुध्दा सुरू झालेली आहे. मागील आठवड्यात या चित्रपटाचे एक गाणे सुध्दा शूट झाले आहे….

पुढे वाचा ..

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांबद्दल  दोन्ही देशांच्या (DGMO) महासंचालकामध्ये आज संपर्क साधला गेला. यावेळी दोन्ही देशात शस्त्रसंधी पालनाबाबत सहमती झाली आहे. हा संपर्क पाकिस्तानच्या महासंचालकाकडून काल सायंंकाळी ६ वाजता साधला गेला. भारताचे महासंचालक (डीजीएमओ) अनिल चौहाण आणि पाकिस्तानचे महासंचालक (डीजीएमओ) साहिर मिर्झा यामध्ये शस्त्रसंधी पालनाबाबत चर्चा झाली.

पुढे वाचा ..

प्रवीण तोगडीया पुन्हा अॅक्टीव्ह, हिंदुत्वासाठी नवीन पक्ष स्थापणार

प्रवीण तोगडीया पुन्हा अॅक्टीव्ह, हिंदुत्वासाठी नवीन पक्ष स्थापणार

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभर फिरून एकेकाळी वातावरण तयार करणारे विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे आता एक नवा पक्ष स्थापन करणार असून त्या पक्षाचे नाव लवकरच घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त स्वप्ने दाखवून विकास होत नसतो, त्यासाठी कामही करावे लागते, मोदि सरकारच्या कामाला मी उणे २५% गुण देतो, देशात मोदींचंं सरकार आलं पण यात सामान्य माणसाचं काहीच भलं झालेलं नाही. प्रवीण तोगडिया  कलम ३७० रद्द करावं, अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी कायदा करावा या मागण्यांसाठी मी…

पुढे वाचा ..

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

आरएसएस देणार इफ्तार पार्टी

मुंबई: सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु आहे, २०१९ सालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रमजान महिन्यात यंदा आरएसएस सुद्धा इफ्तार पार्टी देणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातली मुस्लीम राष्ट्रीय मंच हि संघटना ६ जूनला सरकारी मालकीच्या सह्याद्री अतिथीगृहात हि इफ्तार पार्टी देत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुस्लीम देशांचे प्रतिनिधी सुद्धा हजार राहणार आहेत. संघ परिवारातील संघटना इतर पक्षांच्या नेत्यांवर इफ्तार पार्टीत भाग घेतल्याच्या मुद्द्यावरून सतत टीका करत असताना संघाने यावर्षी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उचललेले हे…

पुढे वाचा ..

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

सोळा दिवसानंतर पेट्रोलच्या दरात एक पैशाची कपात.

पेट्रोलचे दर रोज नवनवीन उच्चांक गाठत असताना मोदि सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत चक्क एका पैशाची घसघशीत कपात केली आहे. याआधी पेट्रोलियम कंपनीच्या वेबसाईटवर ६० पैशांनी पेट्रोल स्वस्त झाल्याचे दाखवत होते. मात्र कंपनीने हि चूक सुधारत लगेच हि कपात साठ पैशांची नाही तर एक पैशाची आहे असे स्पष्ट केले. सध्या पेट्रोलची सरकारला पडणारी किंमत हि ४१ रुपयांच्या आसपास आहे मात्र पेट्रोलवर तब्बल ११०% टॅक्स सरकार गोळा करत असल्याने पेट्रोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे….

पुढे वाचा ..
1 31 32 33 34 35 40