‘खाऊंगा और खिलाऊंगा भी’- राफेल करार आणि नवनवीन खुलासे!!!

‘खाऊंगा और खिलाऊंगा भी’- राफेल करार आणि नवनवीन  खुलासे!!!

राफेल करारातील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत ८ फेब्रुवारी २०१९ रोजी दि दिंदू या वृत्तपत्रात एन. राम यांचा लेख प्रकाशित झाला. त्यात सर्वात महत्वपूर्ण बाब अशी होती की, सुरक्षा सचिव यांनी DAC शिवाय पंतप्रधान कार्यालयाकडून विमान खरेदीबाबत दसाल्ट सोबत समांतर वाटाघाटी केल्या जात होत्या आणि या समांतर प्रयत्नामुळे राफेल खरेदी करारात आपली बाजू कमकुवत झाल्याचा आरोप केला होता. या संबंधीचे कागदपत्रांचे पुरावे म्हणून त्या नोटचा फोटोग्राफ देखील प्रकाशित करण्यात आला. हे वृत्त जाहीर होईपर्यंत १२६ विमानांच्या खरेदीचा…

पुढे वाचा ..

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले…

अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले…

अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला हजर राहण्याकरिता निघालेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विमानात बसण्यापासून मज्जाव करण्यात आला. लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे प्रयागराज येथील विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला उपस्तिथ राहण्याकरिता विमानाने निघाले असताना, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात बसण्यापासून रोखले, याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांना याबद्दल काहीही सांगता आलेले नाही. संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कानुसार, व्यक्तीला देशात कोठेही फिरण्याचा वा वास्तव करण्याचा अधिकार असताना अखिलेश यादव यांच्या बाबतीत घडलेली हि…

पुढे वाचा ..

नागेश्वररावांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक….

नागेश्वररावांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक….

न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी नागेश्वर राव यांना आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ‘एक दिवस कोर्टात बसून राहण्याची’ शिक्षा सुनावली आहे, त्याचबरोबर, १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सीबीआय प्रमुखपदी एम. नागेश्वरराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागेश्वरराव यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्यांमध्ये संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांचा देखील समावेश होता. शर्मा यांच्या बदली प्रकरणात एम. नागेश्वर राव…

पुढे वाचा ..

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं…

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं…

एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करार फ्रान्समध्ये जाहीर करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी रिलायन्सचे अनिल अंबानी आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री ज्यों युविस ला ड्रायन यांच्यात एक गुप्त आणि खासगी बैठक झाली होती अशी झोप उडवणारी बातमी आज इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. फ्रान्सचे औद्योगिक सल्लागार ख्रिस्तोफर सॉलोमन आणि तांत्रिक सल्लागार ज्योफ्री बोकोट हे या बैठकीला हजर होते. बैठक अत्यंत घाईघाईत आयोजित करण्यात आली होती असं सॉलोमन यांनी सांगितल्याचं एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे. भारत आणि…

पुढे वाचा ..

मायावती – अखिलेश नमले ? काँग्रेसला महाआघाडीत येण्याचे आमंत्रण

मायावती – अखिलेश नमले ? काँग्रेसला महाआघाडीत येण्याचे आमंत्रण

प्रियांका गांधी-वद्रा यांच्या राजकारणातील अधिकृत प्रवेशाने भारतातील राजकारणाला एक नवीन वळण आले आहे. प्रियांका गांधी यांच्या या प्रवेशाने कॉंग्रेसची बाजू अधिक बळकट होताना दिसत आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. यानंतर उत्तर प्रदेशमधीलदेखील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशाचा व त्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम बघून बसपा-सपा यांनी कॉंग्रेसला महाआघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले दिसत आहेत. या दोन्ही पक्षाच्या महाआघाडीत कॉंग्रेसला १४ जागा…

पुढे वाचा ..

एकांगी पत्रकारितेला तडाखा, अर्णब गोस्वामीवर FIR दाखल करण्याचे आदेश…

एकांगी पत्रकारितेला तडाखा, अर्णब गोस्वामीवर FIR दाखल करण्याचे आदेश…

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणात गोपनीय कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केल्याने रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात न्यायालयाने पोलिसांना FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शशी थरूर यांनी त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्युसंबंधित पोलीस तपासणीतील गोपनीय कागदपत्रे प्रसारमाध्यामांसमोर आणल्याप्रकरणी तसेच, त्यांच्यावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करून विनापरवानगी त्यांचा ई-मेल संदेश वापरल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर निकाल देताना दिल्ली न्यायालयाने…

पुढे वाचा ..

राफेल व्यवहारात मोदींनी सोडले भ्रष्टाचाराला मोकळे रान, नवीन कागदपत्रे समोर

राफेल व्यवहारात मोदींनी सोडले भ्रष्टाचाराला मोकळे रान, नवीन कागदपत्रे समोर

राफेल व्यवहारात प्रधानमंत्री मोदींच्या कार्यालयाने केलेल्या हेराफेरीबद्दल आपण वाचले असेलच, या मालिकेतील नवीन कागदपत्रे आज मिडीयाच्या हाती लागले असून यातही अजून खळबळजनक माहिती उजेडात येत आहे. राफेल व्यवहारात मोदींच्या हस्तक्षेपामुळे बँक ग्यारंटी न घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र अशा परिस्थितीत आर्थिक देवाणघेवाण हि एस्क्रो अकौंटच्या माध्यमातून करण्यातून करण्यात यावी हा तज्ञांचा सल्लादेखील मोदि सरकारने फेटाळल्याचे समोर येत आहे. याहून विशेष बाब म्हणजे, राफेल व्यवहारातील भ्रष्टाचार रोखणारी कलमेच मोदि सरकारने काढून टाकल्याचे समोर येत असून हि…

पुढे वाचा ..

वसुधैैव कुटुंबकम…?

वसुधैैव कुटुंबकम…?

“वसुदेव कुटुंबंकम”….हि संपूर्ण पृथ्वी हि आपली आहे. हे सांगण्यामागे कारण हे कि मानवता संपूर्ण विश्वात टिकावी. परंतु, रोहिंग्यांचा विषय आला कि हे सगळ खूप मागे पडताना दिसतं. रोहिंग्या हे मूळचे म्यानमारचे व जातीने अल्पसंख्यांकित मुस्लीम समाजातून असलेले…. म्यानमारच्या पूर्वेकडील अरकान या भागात हे लोक वास्तव्यास होते. परंतु, म्यानमार सरकारने या रोहिंग्याना तुम्ही आमच्या देशातील नव्हे तर, बांग्लादेशातील निर्वासित आहात, म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. म्यानमार सरकारने या रोहिंग्या मुसलमानांना पळवून लावण्यासाठी, त्यांचा खात्मा करण्यासाठी…

पुढे वाचा ..

१३ पॉईंट रोस्टर : आरक्षण संपवण्याचा मोदि सरकारचा केविलवाणा प्रयत्न..

१३ पॉईंट रोस्टर : आरक्षण संपवण्याचा मोदि सरकारचा केविलवाणा प्रयत्न..

संविधानाच्या अनुच्छेद 16(ड) नुसार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास जाती ह्यांना सरकारी नोकरीत आरक्षणाची तरतूद ठेवली गेली आहे.त्यानुसार विश्वविद्यालय आणि महाविद्यालयात प्राध्यापकांची भरती करताना रोस्टर पद्धतीचा वापर केला जातो.हि पदे भरताना एससी,एसटी आणि ओबीसी ह्यांना त्यांच्या संविधानिक आरक्षणानुसार राखिव जागेच्या संख्येचा मापदंड ठरविण्यात येतो.त्यासाठी संपुर्ण विश्वविद्यालयात वा महाविद्यालयात प्रत्येक 200 पदांच्या भरतीत अनुसूचित जमातीला त्यांच्या 7.5% आरक्षणानुसार 15 जागा,अनुसूचित जातींना त्यांच्या 15% आरक्षणानुसार 30 जागा आणि ओबीसींना त्यांच्या 27% आरक्षणानुसार 54 जागा व अनारक्षित जागेसाठी…

पुढे वाचा ..

राफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर

राफेल व्यवहारात मोदींची हेराफेरी, नवीन कागदपत्रे समोर

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात प्रधानमंत्री कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला बाजूला सारून फ्रेंच सरकारशी स्वतंत्ररित्या वाटाघाटी केल्याचे समोर आले आहे. प्रधानमंत्री कार्यालय समांतर वाटाघाटी करत असल्याने भारत सरकारची बाजू कमकुवत होत असल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट होते. प्रधानमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेंच सरकार व कंपन्यांशी थेट संपर्क टाळावा, याने किंमतीबद्दल वाटाघाटी करण्याची आपली क्षमता कमी होत आहे, याबाबीची संरक्षण मंत्र्यांनीही नोंद घ्यावी अशी नोट संरक्षण सचिव, जी. मोहन कुमार यांनी केलेली या कागदपत्रात आढळून येते. हि कागदपत्रे आज मिडीयाच्या…

पुढे वाचा ..
1 2 3 4 5 36