भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचुक, आंतरराष्ट्रीय पातळीवर होतोय गौरव

भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचुक, आंतरराष्ट्रीय पातळीवर होतोय गौरव

संयुक्तराष्ट्र : देशातील हवामान खात्याच्या अहवालावर कधीच कोणीही विश्वास ठेवत नाही. कारण बहुदा त्यांनी दिलेले अंदाज चुकत असतात. त्यामुळे भारतीय हवामान खाते नेहमीच ट्रोल होत असते. भारतात जरी कौतुक झाले नसले तरी भारतीय हवामान खात्याचे अंतरराष्ट्रय स्तरावर कौतुक होत आहे. भारतीय हवामान खात्याने फानी चक्रीवादळासंदर्भात अंदाज वर्तवला होता. तो अगदी तंतोतंत बरोबर ठरला आहे, त्यामुळे UN ने भारतीय हवामान खात्याचे कौतुक करत गौरव केला आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत तसंच अगदी बरोबर दिल्याने अनेक लोकांचे…

पुढे वाचा ..

पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पार्थ पवारांनंतर रोहित पवारांची राजकारणात एन्ट्री!!!

पुणे : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘बाप माणूस’ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. त्यांना राजकारणातील ‘चाणाक्य’ म्हटलं जाते. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे राजकारणातील वावर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे सर्वांसाठी केंद्रच बनले आहे. त्यांच्या सोबत असणारे कौतुक करतात तर विरोधक त्यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत होत नाहीत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार निवडणूक लढवणार की नाही या चर्चांना उधाण आले होते. खूप नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर एकाच घरातून लोकसभेला किती उमेदावर उतारावेत याला मर्यादा…

पुढे वाचा ..

‘जेट’च भवितव्य अंधातरीत! ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही

‘जेट’च भवितव्य अंधातरीत! ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही

नवी दिल्ली : लिलावात निघालेली जेट एअरवेज कंपनीवर अजून एक संकट आले आहे. जेट कंपनी लिलावात निघाली आहे, मात्र तिचा भांडवली हिस्सा खरेदी करण्यात कोणीही रुचि दाखवत नाही हे समोर येत आहे. इच्छुक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्याची चिन्ह होती. मात्र तेही आखडता हात घेत आहेत. त्यामुळे जेट कंपनी बंद पडण्याची शक्यता वाढत आहे. सध्या जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्यासाठी १० मे पर्यंत निविदा सादर करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत एकाही कंपनीने निविदा दिली नाही. सध्या जेटचे…

पुढे वाचा ..

शहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल

शहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल

मुंबई : देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराचे सावट सर्वत्र आहे. सगळीकडे कोणतेही काम करुन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा भ्रष्टातार सरकारी खात्यात सर्वाधिक रुजलेला आहे. कोणतेही सरकारी काम करावयाचे असल्यास क्लर्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पैसे द्यावे लागतात. हे वर्षांनूवर्ष चालत आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार सहज बंद होणे किंवा त्यावर चाप लागणे थोडे असंभवच. २०१८ मधील लाचखोरीची प्रकरणांपेक्षा या चालू वर्षात लाचखोरीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१८मधील जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यात लाचखोरी प्रकरणावरून केलेल्या कारवाईत…

पुढे वाचा ..

कौतुकास्पद! इस्रोचे माजी संचालक ‘किरण कुमार’ फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

कौतुकास्पद! इस्रोचे माजी संचालक ‘किरण कुमार’ फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : देशात सध्या अनेक मोठ्या घडामोठी घडत आहेत. त्यात भारतासाठी अभिमानास्पद बातमी आहे. इस्रोचे माजी संचालक ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सनं सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारत आणि फ्रान्समधील अंतराळ सहकार्य वाढवण्यासाठी कुमार यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना ‘शेवेलियर डी लॉर्ड नेशनल डी ला लिगियन डी ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दोन देशांमधील अंतराळ तंत्रज्ञानाला नवा आयाम दिला, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला, असं फ्रान्सचे अंतराळ संशोधन…

पुढे वाचा ..

सर्जिकल स्ट्राईकबद्दल मनमोहन सिंह यांचा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले ते…

सर्जिकल स्ट्राईकबद्दल मनमोहन सिंह यांचा गौप्यस्फोट, वाचा काय म्हणाले ते…

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यातील मास्टर माईंड मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. भारत यासाठी पूर्वीपासून प्रयत्न करत होता मात्र चीन यास नकार देत होता. आता चीनने माघार घेतली आहे. त्यामुळे मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करता आले. त्यानंतर भारतात आता याचे यश पंतप्रधान मोदींना देत आहेत. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून हे साध्य झाले असं म्हटलं जात आहे. तसंच देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत याचा अप्रत्यक्ष प्रचारासाठी वापरही केला जात आहे….

पुढे वाचा ..

उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याने गावकऱ्यांमध्ये यावरून संताप व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याचे नाव दत्तू मोरे असं असून ते ७० वर्षांचे होते. या घटनेच्या निषेधार्थ तलमोड गावातील गावकऱ्यांनी पहाटे पाच पासून ठिय्या आंदोलन करत आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी या ठिय्या आंदोलनात मृतदेहाचाही समावेश केला आहे. मागच्या रविवारी उमरगा तालुक्यातील तलमोड जवळील कराळी येथे एक दुर्घटना घडली होती. चारचाकी गाडीचे पुढील चाकाचा…

पुढे वाचा ..

‘या’ प्रकरणात उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी ..

‘या’ प्रकरणात उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट जारी ..

यवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाची शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्रातून खिल्ली उडवून अपमान करण्यात आला होता. त्याप्रकरणी पुसदच्या न्ययालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात या चौघांना समन्स बजावूनही न्यायालयाने दिलेल्या तारखेला हजर राहिले नाहित. हे प्रकरण लांबवण्याच्या हेतूने जाणून-बुजून गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावा, असं पुसद न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं आहे. राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी…

पुढे वाचा ..

निवडणूक ओळखपत्र आहे का? नसेल तरीही मतदान करता येऊ शकते

निवडणूक ओळखपत्र आहे का? नसेल तरीही मतदान करता येऊ शकते

पुणे : लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या देशभर वाहत आहेत. लोकसभा निवडणूका म्हटल्या की नागरिकांचा या मोलाचा वाटा असतो. नागरिकांच्या मतानेच खासदार निवडला जातो. त्यामुळे कोणाला उचलायचे आणि कोणाला पाडायचे हे या मतदार राजाच्या हाती असते. हेच निवडून आलेले सदस्य देशाच्या विकासाला हातभार लावणार असतात. त्यामुळे देशातील प्रत्येकाने विचारपूर्वक मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अनेकदा मतदानाचे कार्ड नाही म्हणून खूप लोक मतदान करत नाहीत. त्यांच्या एका मताच्या कमीने चांगला उमेदवारही पराभूत होऊ शकतो. त्यामुळे असे कारणे न…

पुढे वाचा ..

ज्याने मतदानावर ‘बहिष्कार’ टाकला तो बनला ‘खासदार’; वाचा नेमका काय आहे प्रकार

ज्याने मतदानावर ‘बहिष्कार’ टाकला तो बनला ‘खासदार’; वाचा नेमका काय आहे प्रकार

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीत आपला सहभाग हा मतदान करुन दाखवता येतो. मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यात होते म्हणजे १८ एप्रिलला घेण्यात आले. या मतदार संघातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांमध्ये स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी आहे. तसंच गावातील असुविधांमुळे नाराज गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. मतदान झाले त्यावर बहिष्कार टाकून झाला. हे सर्व गावातील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शकंर गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले. गायकवाड यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला…

पुढे वाचा ..
1 2 3 4 39