मोदी सरकारच्या काळात देशावरचं कर्ज दीडपटीने वाढलं, सरकारची कबुली

मोदी सरकारच्या काळात देशावरचं कर्ज दीडपटीने वाढलं, सरकारची कबुली

नवी दिल्ली:  नवी दिल्ली: मोदी सरकारच्या कार्यकाळात सरकारवरच्या कर्जाचा बोजा दिडपटीने वाढला असल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. जून 2014 पर्यंत सरकारवर 54,90,763 कोटींचं कर्ज होतं, सप्टेंबर 2018 पर्यंत हा आकडा वाढून 82,03,253 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे जून 2014 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत भारत सरकारवर असलेल्या कर्जात दिडपटीने वाढ झालेली आहे. या कर्जात जागतिक बँकेकडून मोदी सरकारने घेतलेली कर्जेही समाविष्ट आहेत, स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया व मेक इंडिया अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठी मोदी सरकारने…

पुढे वाचा ..

अलर्ट : 2000 च्या नोटांची छपाई बंद

अलर्ट : 2000 च्या नोटांची छपाई बंद

नवी दिल्ली : नोटबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २००० च्या नोटांची छपाई कमीत कमी प्रमाणात करण्यात येत असून, लवकरच या नोटांची छपाई पूर्णपणे बंद करण्याचा विचार आरबीआय करते आहे. मोठ्या नोटा या काळा पैसा व अवैध व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारात या नोटांचा फारसा सहभाग नसतो, मात्र केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीचे पैसे मोठ्या नोटांच्या स्वरूपात दिले जात होते, यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. “द प्रिंट” या…

पुढे वाचा ..

सातव्या वेतन आयोगासाठी तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद..

सातव्या वेतन आयोगासाठी तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद..

मुंबई :  केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग लागू केल्याबरोबर राज्यशासनाच्या कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होऊन पगारवाढ होण्याची खुशखबर मिळाली आहे. राज्य सरकारला या वाढलेल्या पगारासोबत मागील थकबाकीचेही पैसे द्यावे लागतील. थकबाकीची रक्कम सात ते साडेसात हजार कोटीपर्यंत जाईल. चौदा हजार कोटींची या वर्षाची पगारवाढ होईल, इतर सर्व व्यवस्थापन लक्षात घेता तब्बल चोवीस हजार कोटींची तरतूद सरकारला या वर्षीच्या पगारांसाठी करावी लागणार आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर असताना या तरतुदींमुळे तिजोरीवर अजून आर्थिक भार…

पुढे वाचा ..

ऑनलाइन खरेदीवरचे डिस्काउंट बंद, मोदी सरकारचा निर्णय

ऑनलाइन खरेदीवरचे डिस्काउंट बंद, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली: तुम्ही ऑनलाइन खरेदी करणार असाल तर ती 1 फेब्रुवारीच्या आधीच उरकून घ्या कारण 1 फेब्रुवारी 2018 पासून मोदी सरकारचं नवीन एफडीआय धोरण लागू होणार असून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना आता यापुढे भरमसाठ डिस्काउंट व कॅशबॅक देता येणार नाहीत. सहसा बाजारात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा ऑनलाइन जास्त विविधता व योग्य दर मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा हा ऑनलाइन खरेदीकडे जास्त असतो, गेल्या सात वर्षात ऑनलाइन खरेदीचा ग्राहक अकरा पट वाढला आहे. एखादी वस्तू विकत घ्यायची असल्यास ग्राहक…

पुढे वाचा ..

अखेर मोदी सरकार वापरणार काँग्रेसचा टॅक्स फॉर्म्युला..

अखेर मोदी सरकार वापरणार काँग्रेसचा टॅक्स फॉर्म्युला..

नवी दिल्ली : आपल्या एका ब्लॉगपोस्ट मध्ये जीएसटी बद्दल मत व्यक्त करताना अरुण जेटली यांनी देशात 0%, 5% व 12 व 18 टक्क्यांच्या मध्यबिंदूवर एक स्लॅब अशी रचना होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. 28% जीएसटी आता जवळजवळ संपला असून फक्त तंबाखू उत्पादने व काही चैनीच्या वस्तूच त्यात राहतील अशी काळजी आम्ही घेतली आहे असं ते म्हणाले. टॅक्स नसलेल्या वस्तूंचा 0% स्लॅब, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या 5% स्लॅब व 12 ते 18 स्लॅब रद्द करून या दोघांच्या…

पुढे वाचा ..

मध्यमवर्गीयांना मोदींचा अजून एक दणका

मध्यमवर्गीयांना मोदींचा अजून एक दणका

मुंबई : नोटबंदी व जीएसटीने वाताहत झालेल्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेची कुठलीही चिन्हे दिसत नसताना मोदी सरकारच्या धोरणांनी मध्यमवर्गीयांना अजून एक जोरदार दणका बसला आहे. गृहकर्ज व वाहनकर्ज घेतलेल्या सर्वांचेच धाबे या निर्णयाने दणाणले आहे. डिसेंम्बरच्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेने आपले रेपो रेट बदलले नाहीत, मात्र बँकांची कॉस्ट ऑफ डिपॉझिट वाढली आहे. मार्केटमध्ये मंदीची स्थिती असल्याने व महागाई असल्याने उलाढालीचे प्रमाण कमी झालेले आहे. बँकांकडून मोठ्या थकबाकीदारांनी उचललेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने एनपीए वाढ होत आहे. वसुलीचे प्रमाण…

पुढे वाचा ..

पुन्हा असे प्रसंग होऊ नये म्हणून झोमॅटो करणार हि युक्ती..

पुन्हा असे प्रसंग होऊ नये म्हणून झोमॅटो करणार हि युक्ती..

मुंबई : झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय कस्टमरच्या जेवणाचे पार्सल उघडून सगळे पदार्थ चाखून पहात असल्याचा व्हीडीओ आपण सर्वांनी पाहिला असेलच. रोज ऑनलाईन ऑर्डर करून काही न काही खाणार्यांना तर तो व्हीडीओ पाहून खूपच मोठा धक्का बसला होता. हा प्रकार लक्षात आल्याबरोबर झोमॅटोने लगेच त्या डिलिव्हरी बॉयची हकालपट्टी करत ग्राहकांची क्षमा मागितली होती. मात्र त्याचवेळेस असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आम्ही काही उपाययोजना करणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले होते. अतिशय लांब कामाचे तास व वेळेत डिलिव्हरी करण्याचे…

पुढे वाचा ..

मोबाईलवर “फ्री इनकमिंग” लवकरच बंद होणार ..

मोबाईलवर “फ्री इनकमिंग” लवकरच बंद होणार ..

मुंबई: तुमच्या फोनवर लाईफटाईम व्हॅलीडीटी आहे का ? २००८ साली कित्येक जणांनी रांगेत उभं राहून ९९९ रुपये भरून (किंवा वर्षभर ९९ रुपये दरमहा भरून) आपापल्या फोनवर लाइफ़टाईम व्हॅलीडीटी प्लान घेतला असेल. दर महिन्याला रिचार्ज करून मोबाईल सुरु ठेवण्यापेक्षा बऱ्याच युजर्सनी हा साधा सरळ पर्याय निवडला होता, आजकाल तर नवीन सीम विकत घ्यायला गेल्यावर कुणी व्हॅलीडीटी विचारत सुद्धा नाही, मात्र हे सगळं आता बदलणार आहे.. मोबाईल कंपन्या लवकरच फ्री इनकमिंगची सेवा बंद करण्याचा विचार करत आहेत,…

पुढे वाचा ..

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

दिल्ली: नोटबंदी व त्यानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था कर्जबुडवे उद्योजक यामुळे अडचणीत आलेली रिजर्व बँक आज पुन्हा चर्चेचा विषय आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे पालन न केल्याने त्यांना ही नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेले व ती बुडवलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करण्यात यावी. या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे साहस गव्हर्नर उर्जित पटेलांनी केले होते.त्यामुळे आज त्यांना ही नोटीस बजावण्यात…

पुढे वाचा ..

शेअर बाजारात नवा उच्चांक

शेअर बाजारात नवा उच्चांक

गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २८२.४८ अंशांची वाढ होऊन शेअर मार्केटने नवा उच्चांक गाठला आहे. बाजाराचा निर्देशांक ३६ हजार ५४८.४१ अंकांवर पोहचल आहे. गॅॅस आणि बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या खरेदीमुळे हि वाढ दिसली. आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील ५ सत्रांत निर्देशांकात ९७३ अंशांची वाढ झाली आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ७४ अंकांची वाढ झाली आहे. निफ्टीचा निर्देशांक ११ हजार २३ अंकांवर पोहचला आहे. याआधी ३१ जानेवारीला निर्देशांक ११ हजार…

पुढे वाचा ..
1 2 3 4