जीएसटी आणि नोटबंदीमुळे पतंजली बुडणार? ..

जीएसटी आणि नोटबंदीमुळे पतंजली  बुडणार? ..

देशात आर्थिक मंदी आहे व्यापार,उद्योग बर्याच अडचणीत आहे. अनेक कंपन्यांनी कामगार कमी करण्यास सुरवात केली आहे. बाजारात मागणी नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. या आर्थिक संकटा पासून कोणत्याच क्षेत्रातील उद्योग धंदा वाचलेला नाही. रामदेव बाबांचा स्वदेशी ब्रॉड पतंजली ही जीएसटी आणि नोटबंदीमुळे अडचणीत आला आहे. पतंजलीने फास्ट मुविंग कंझ्युमर गुड्स ज्याला आपण FMCG म्हणतो त्यावर अल्पावधीत चांगलीच पकड बसवली होती. हिदुस्तान युनिलीवर नंतर या सेक्टर मध्ये भारतातील दोन नंबरची कंपनी पतंजली आहे. इतकं सर्व असून…

पुढे वाचा ..

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

मोदी सरकारला धोरण‘लकवा’ : मारुती समूहाच्या अध्यक्षांचा आरोप

  भारत सध्या आर्थिक मंदीच्या झळा सोसत आहे.मंदीचा सर्वात अधिक फटका ऑटो कंपन्यांना बसला आहे.अनेक कंपन्यांनी प्रोडक्शन कमी केले आहे तर अनेकांनी कामगार कमी केले  आहेत. त्यातच मारुती उद्योगाचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी मोदी सरकारच्या लकवाग्रस्त धोरणांमुळे ऑटो सेक्टरला फटका बसला असल्याचे म्हंटले आहे. भार्गव म्हणाले “ऑटो सेक्टर आजवरच्या सर्वात निच्चांक पातळीवर असतानाही सरकार अपेक्षित धोरण आखत नाहीये. महागडे पेट्रोल आणि डीझेल त्याच बरोबर वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी आकारण्यात येणारे अतिरिक्ताचे शुल्क. या सर्वाचा भुर्दंड अंतिमतः ग्राहकावर पडतो…

पुढे वाचा ..

“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश

“रस्ते बांधणे थांबवा, संपत्ती विका” मोदी सरकारचा NHAIला आदेश

भारतीय अर्थव्यवस्था किती अडचणीत आहे याची प्रचिती नुकतीच आली जेव्हा सरकारने रिझर्व्ह बँकेकडून एक लाख शहात्तर हजार कोटी इतकी मोठी रक्कम ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेतली. देशात बेरोजगारी सर्वोच्च सीमेला आहे, रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. आत्तापर्यंत अर्थमंत्री निर्मला सितारमण सर्व काही आलबेल असल्याचे भासवत होत्या. पण स्थिती किती गंभीर आहे याची जाणीव करून देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे सरकारने NHAI national highway authority of India ला सध्या देशभर सुरू असणारी सर्व रस्त्याची कामे…

पुढे वाचा ..

‘जेट’च भवितव्य अंधातरीत! ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही

‘जेट’च भवितव्य अंधातरीत! ‘जेट’वर बोली लावण्यास कोणी तयार नाही

नवी दिल्ली : लिलावात निघालेली जेट एअरवेज कंपनीवर अजून एक संकट आले आहे. जेट कंपनी लिलावात निघाली आहे, मात्र तिचा भांडवली हिस्सा खरेदी करण्यात कोणीही रुचि दाखवत नाही हे समोर येत आहे. इच्छुक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्याची चिन्ह होती. मात्र तेही आखडता हात घेत आहेत. त्यामुळे जेट कंपनी बंद पडण्याची शक्यता वाढत आहे. सध्या जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्यासाठी १० मे पर्यंत निविदा सादर करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत एकाही कंपनीने निविदा दिली नाही. सध्या जेटचे…

पुढे वाचा ..

शहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल

शहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल

मुंबई : देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराचे सावट सर्वत्र आहे. सगळीकडे कोणतेही काम करुन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा भ्रष्टातार सरकारी खात्यात सर्वाधिक रुजलेला आहे. कोणतेही सरकारी काम करावयाचे असल्यास क्लर्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पैसे द्यावे लागतात. हे वर्षांनूवर्ष चालत आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार सहज बंद होणे किंवा त्यावर चाप लागणे थोडे असंभवच. २०१८ मधील लाचखोरीची प्रकरणांपेक्षा या चालू वर्षात लाचखोरीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१८मधील जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यात लाचखोरी प्रकरणावरून केलेल्या कारवाईत…

पुढे वाचा ..

मोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ

मोदींची आर्थिक कामगिरी जेमतेम : जागतिक अर्थतज्ञ

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदि आधीच्याच सरकारप्रमाणे आर्थिक सुधारणा घडवून आणतील व देशाला प्रगतीपथावर नेतील अशी अपेक्षा होती, मात्र मोदि सरकारकडून आर्थिक आघाडीवर आमची निराशा झाल्याचे मत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ वोल्फगांग पीटर झैगल यांनी व्यक्त केले आहे. झैगल हे जर्मनीच्या हैडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट चे अर्थतज्ञ आहेत. मोदींची धोरणं हि जर्मन उद्योगांसाठीही निराशाजनक ठरली, भारत चीनसारखी बलाढ्य अर्थव्यवस्था व्हायला यामुळे अजून जास्त वेळ लागेल, भारतात गुंतवणुकीची वेगवेगळी क्षेत्रं अजूनही खुली झालेली नाहीत,…

पुढे वाचा ..

राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

राहुल गांधी यांच्या किमान उत्पन्नाच्या योजनेला अर्थतज्ञांचा आधार

२०१५ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ ऍन्गस डेटॉन व फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पीकेटी हे राहुल गांधी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘कमीतकमी उत्पन्नाची हमी’ या योजनेच्या आराखडा निर्मितीमध्ये त्यांची मदत करत असल्याचे सामोर आले आहे. येत्या २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त झाल्यास आपण “कमीतकमी उत्पन्नाची हमी” देणारी योजना प्रत्येक भारतीयासाठी लागू करणार असल्याचे कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. हि योजना कोणत्या पद्धतीने राबवता येईल? ती प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचू…

पुढे वाचा ..

‘अर्थ’पूर्ण निवडणुका…

‘अर्थ’पूर्ण निवडणुका…

लोकशाहीत लोकांनी, लोकांसाठी काम करायचे असते. यासाठी निवडणूक पद्धती ठरवण्यात येते व त्या पद्धतीनुसार, ज्याला बहुमत प्राप्त होते. तो पक्ष पाच वर्षांकरिता सत्ताधारी पक्ष म्हणून काम पाहत असतो. लोकांची विकासाची काम करणारा, त्याचप्रमाणे विकासाची आश्वासनं देवून ती खरी करणारा गट/पक्ष सत्तेत येत असतो. परंतु, सत्ताधारी बनण्याची प्रक्रिया एवढी सोपी राहिलेली नाही. याकरिता ‘पैसा’ हा एक महत्वाचा घटक बनलेला आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, तो आज तरी राजकारणात सत्ता कुणाकडे असली पाहिजे, सरकारची धोरणे काय असली…

पुढे वाचा ..

किमान उत्पन्नाची हमी – सर्वसमावेशक विकासाची कॉंग्रेसची नीती

किमान उत्पन्नाची हमी – सर्वसमावेशक विकासाची कॉंग्रेसची नीती

‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ सबका विकास’ चे आश्वासन देत नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत आले. पण जुमलेबाजी हाच या सरकार चा स्वभावधर्म राहिलेला आहे. जाहिरातबाजी म्हणजेच विकास हिच या सरकारची विकासाची परिभाषा आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाव ‘ या योजनेवर गेल्या चार वर्षांत जो खर्च झाला त्यापैकी तब्बल ५६% निधी या सरकारने जाहिरातींवर खर्च केला यापेक्षा अधिक काय सांगावे. ‘ कुछ उद्योगपतीयो को साथ और उनका हि विकास ‘ हि या सरकारच्या विकासाची दृष्टी…

पुढे वाचा ..

अर्थसंकल्पाची होणार चिरफाड-रत्नाकर महाजन

अर्थसंकल्पाची होणार चिरफाड-रत्नाकर महाजन

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हे प्रकृतीच्या कारणाने अनुपस्थितीत असल्याने अर्थमंत्रालयाची जबाबदारी पाहणाऱ्या हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीय नोकरदार वर्गासाठी काही घोषणा आणि भावी काळासाठीच्या काही तरतुदी मांडत गोयल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. गोयल यांनी काल मांडलेल्या या अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणतीच संवैधानिक तरतूद नसल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ऍड. मनोहर लाल…

पुढे वाचा ..
1 2 3 4