आर्थिक मागास असलेल्या सवर्णांना मिळणार आरक्षण ?

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकात दणकावून मार खालेल्या भाजपाने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकानुयायी निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे. सवर्ण समाजतील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पारित करण्यात आला. वर्षाला आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या किंवा पाच एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या सवर्ण जातींच्या नागरिकांना या आरक्षणाचा लाभ घेण्याची तरतूद या प्रस्तावात केली आहे

हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत पारित झाला असला तरी तो आता आधी लोकसभेत पारित करावा लागेल, त्यानंतर राज्यसभेतहि तो पारित करावा लागेल. हे आरक्षण सध्या असलेल्या ५०% आरक्षणाच्या मर्यादेच्या वर असेल म्हणून कदाचित सर्वोच्च न्यायालयातही यावर  एखादी याचिका दाखल होऊ शकते.

माजी पंतप्रधान पी. व्ही, नरसिंहराव यांनीही आर्थिक मागासांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता मात्र, ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून जात असल्याने हे आरक्षण टिकले नव्हते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment