शहरात लाचखोरीत घट, मात्र ‘महसुल खात’ लाचखोरीत अव्वल

मुंबई : देशात आणि राज्यात भ्रष्टाचाराचे सावट सर्वत्र आहे. सगळीकडे कोणतेही काम करुन घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. हा भ्रष्टातार सरकारी खात्यात सर्वाधिक रुजलेला आहे. कोणतेही सरकारी काम करावयाचे असल्यास क्लर्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना पैसे द्यावे लागतात. हे वर्षांनूवर्ष चालत आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार सहज बंद होणे किंवा त्यावर चाप लागणे थोडे असंभवच.
२०१८ मधील लाचखोरीची प्रकरणांपेक्षा या चालू वर्षात लाचखोरीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१८मधील जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यात लाचखोरी प्रकरणावरून केलेल्या कारवाईत ३०१ सापळे लावण्यात आले. त्यातील ४१० लाच घेणाऱ्यांना अटक करण्यात आले. मात्र या तुलनेत या वर्षात २९२ सापळे रचण्यात आले. तर ३८७ लाच घेणाऱ्या अरोपींना अटक करण्यात आली.
मुख्यतः पुणे सांस्कृतिक शहर मानले जाते. अभ्यास, कला, क्रीडा, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात पुणे अव्वल आहे. मात्र लज्जास्पद गोष्ट अशी की लाचखोरांच्या बाबतीत पुणे अव्वल आहे. गेल्या ४ महिन्यांत एकूण १५ प्रकरणांमध्ये १८ लाचखोर आरोपींवर दोष निश्चिती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हे समोर आले आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सामान्य माणसाचा पोलिस आणि महसून विभागाशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत हे दोन्ही विभाग अग्रभागी होते. त्यानुसार त्यांनी कारवाई केली. तर पुण्यात महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे, हे चित्र समोर आले आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment