बॉलिवूड मधील ४९ प्रख्यात सेलिब्रिटी देशद्रोही? 

 

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील पोलीस स्टेशन मध्ये बॉलिवूडमधील प्रख्यात ४९ सेलिब्रेटीविरुद्ध देशद्रोहाचा ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ४९ सेलिब्रेटीमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत जसे की, सौमित्र चॅटर्जी, श्याम बेनेगल, शुभा मुग्दल, अडूर गोपाळकृष्णन, अपर्णा सेन, मणिरत्नम, अनुराग कश्यप, आणि इतर सेलिब्रेटींनचा समावेश आहे. यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून देशामधील वाढत्या मॉब लिचिंगच्या घटनांबद्दल खुलं पत्र लिहिले. या पत्रामध्ये सेलिब्रेटीनी असे म्हटले आहे की ,

अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती-जमाती यांच्या बाबतीत मॉब लिचिंगच्या ज्या घटना घडत आहेत त्या तातडीने रोखल्या जाव्यात. तसेच लोकशाहीमध्ये कोणत्याही विधानावर असमंती असतेच परंतु अशा लोकांना अँटी-नॅशनल म्हणू नये.”

भीमा कोरेगाव मधील मॉब लिचिंगच्या घटना तसेच योगेश राज या आरोपीवरील लोकांच्या भावना भडकून दंगे घडून आणण्याचा गुन्हा इत्यादी घटनांमुळे मॉब लिचिंग विषयावर प्रकाश पडला आणि यामुळे सेलिब्रेटीनी पंतप्रधांना पत्र लिहिले.

सेलिब्रेटीनी उचलेल्या या पावलामुळे वकील सुधीर कुमार ओझा यांनी दोन महिन्यांपूर्वी या सेलिब्रेटीविरुद्ध मुझफ्फरपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये याचिका दाखल केली आणि यानंतर न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्या आदेशानंतर,

३ ऑक्टोबर रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. वकील सुधीर कुमार यांनी या सेलिब्रेटीविरुद्ध देशद्रोह, धार्मिक भावना दुखवणे आणि लोकांमध्ये हिंसा पसरवण्याचा प्रयत्न, शांतता नष्ट करणे या गुन्ह्यांचा कालमानांतर्गत गुन्हा दाखल केला.

वकील ओझा यांचा सेलिब्रेटीविरुद्ध असा आरोप केला आहे कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणारे सेलिब्रेटींविरुद्ध देशाच्या प्रतिमेला धक्का बसवत आहे. नरेंद्र मोदींची कामे योग्य नसल्याचे प्रदर्शित केले जात आहे. लोकांमध्ये खिन्नता निर्माण करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न चालू आहे.”

.

Leave a Comment