शेतकऱ्यांनी सुजय विखेंना पाठवले दोन हजार रुपये

भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अलीकडेच कर्जत जामखेड मध्ये प्रचारादरम्यान, शेतकऱ्यांना संबोधून एक वक्तव्य केले.

“तुम्हाला पंतप्रधान मोदी यांनी खात्यावर टाकलेले दोन हजार रुपये चालतात. मग भाजपचे चिन्ह असलेले कमळ का नको? मतदान करायचं नसेल तर खात्यावर जमा केलेले पैसे शेतकऱ्यांनी परत करावेत”

या वाद्ग्रस्त वक्तव्यानंतर मीडियाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीच पण या वक्तव्यामुळे सुजय विखे यांनी मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांचा रोष ही ओढवून घेतला.

याच वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर मधील काही तरुण शेतकऱ्यांनी, थेट सुजय विखे यांना दोन हजार रुपयांचा धनादेश पाठविला आहे. हा धनादेश पोस्टाने त्यांच्या राहत्या घरी पाठवण्यात आला आहे. सोबत निषेध करणारे एक पत्र ही लिहले आहे.

तरुण शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सुजय विखे यांनी आमच्या श्रमाची किंमत करून कष्टकरी शेतकरी वर्गाचा अपमान केला आहे, अशी भावना व्यक्त केली.

 

.

Leave a Comment