सेलिब्रिटी विकणे आहे…

नुकतेच कोब्रापोस्ट या वेबसाईटने बॉलीवूड चे कलाकार राजकीय पक्षांचा प्रचार करण्यासाठी कसा स्वतःच्या सोशल मिडीयावरील फॉलोअर्स चा वापर करत आहेत, याबद्दल एक खळबळजनक सत्य समोर आणले आहे.

कोब्रा पोस्ट ने केलेल्या या तपासात बॉलीवूडमधील कलाकार सत्ताधारी भाजप सरकारच्या योजनेला किवा एखाद्या घोषणेला जास्तीतजास्त लोकांनी पसंती द्यावी यासाठी पैसे घेवून पोस्ट करत असल्याचे उघडकीस आणले आहे.

कोब्रा पोस्टने केलेल्या तपासात ३६ बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.
या ३६ कलाकारांमध्ये, विवेक ओबेरॉय, महिमा चौधरी, सन्नी लिओन, अमिषा पटेल, टिस्का चोप्रा, जॉकी श्रॉफ, शक्ती कपूर, नृत्य दिग्दर्शक आचार्य गणेश, राहुल भट, सोनू सूद, श्रेयस तळपदे, राखी सावंत, मनीषा लांबा, कैलास खेर, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, पूनम पांडे, मिका सिंग, राजू श्रीवास्तव, अभिजित भट्टाचार्य, बाबा सेहगल राजपाल यादव, कृष्ण अभिषेक, सुनील पाल, उपासना सिंग, पंकज धीर, निकीतीन धीर अशा अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे.
या ३६ बॉलीवूड कलाकारांमध्ये गायक, नृत्य दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्र्या यांचा समावेश आहे.

सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपा ने आपल्या योजना किवा कामे कशी जनकल्याणकारी आहेत हे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या बॉलीवूडमधील कलाकारांच्या खोट्या मताचा वापर केला व त्याबदल्यात या कलाकारांना मागेल ती किमत अदा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कलाकारांपैकी बहुतेक कलाकारांनी कॅमेरयासमोर याची कबुली दिलेली आहे.

कोब्रापोस्ट च्या सौजन्याने…

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment