पत्रकारांना एका बातमीसाठी भाजप १५००० रु देणार !

२०१४ च्या निवडणुकी आधी आम्ही काळा पैसा परत आणू. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकू अशी घोषणा भाजपने केली. भाबड्या सामान्य जनतेने पंधरा लाखाच्या आशेने भाजपला माते दिली. पण निवडुन आल्यानंतर भाजपने घुमजाव केला अणि तो केवळ एक जुमला होता असे खुद्द अमित शाहा म्हणाले. पण आत्ता तसे नाहिये आत्ता थेट पेपरातच जाहिरात देण्यात आली आहे.

File photo

होय तुम्ही जर पत्रकार असाल तर पैसे कमावण्याची तुम्हाला एक सुवर्णसंधी आहे. फक्त भाजपा बद्दल  एक चांगली बातमी लावायची अणि पंधरा हजार रुपये घेऊन जायचे. हा निर्णय आहे झारखंडचे भाजप मुख्यमंत्री रघुबीर दास यांच्या सरकारचा. पुढील महिन्यात हरयाणा, महाराष्ट्र अणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यात नव्या घोषणांचा सध्या वर्षाव सुरू आहे.

 

“रघुबीर दास यांनी एक योजना घोषित केली आहे. त्यांच्या सरकारच्या चांगल्या योजना अणि निर्णयाबद्दल जो पत्रकार टीव्ही किवा पेपर मध्ये बातमी लावेल त्याला थेट सरकार पंधरा हजार रुपये रोख देणार”

एवढच नाही तर झारखंड सरकारच्या माहिती अणि जनसंपर्क विभागाने ही जाहिरात प्रतेक पेपरात छापुन आणली. त्यात पत्रकारांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्यास सांगितले आहे.

या निर्णयाचा ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ या विरोधी पक्षाने प्रचंड विरोध केला आहे. या पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले रघुबीर दास सरकारने नैतिकता तर सोडलीच आहे पण नियम ही धाब्यावर बसवाले आहेत. भाजप मात्र पत्रकारांनकडूनच अशी मागणी होती असे सांगून वेळ मारून नेताना दिसत आहे.

रांची प्रेस क्लबचे जनरल सेक्रेटरी शंभूनाथ यांनी मात्र सरकारचे सर्व दावे फेटाळले आहेत. अशी कोणतीही मागणी आम्ही पत्रकारांनी केलेली नाही असं ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले ‘सरकार जर पत्रकारांच्या हितासाठी काही निर्णय घेत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकार थेट पैसे देणार आहे त्यामुळे या निर्णयाबाबत शंका वाटत आहे’.

पुढे ते म्हणाले या सरकारच्या काळात सर्वांना माहित आहे की सरकार कसं सामान्य पत्रकारांना त्रास देण्यात येत आहे, त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहे. मिडिया हाऊसेस च्या मालकांना मात्र सरकार खुश ठेवुन बातम्या मॅनेज करत आहे.

.

Leave a Comment