भाजपचे वाचाळवीर नेते; राजीव गांधीची तुलना कसाब आणि गोडसेंशी

नवी दिल्ली : भारतात लोकसभेच्या रणांगणात टीकास्त्रासांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र या टीका करताना त्यांच्या बोलण्यावर ताबा ठेवणे हे गरजेचे असते. मात्र भाजपची नेते मंडळीतर वाचाळवीरांप्रमाणे टीका करत आहे. भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. त्यावर त्यांनी माफी ही मागितली. या प्रसंगातून भाजप नेत्यांनी काही घ्यायला हवं होतं. मात्र भाजपाच्या नेत्यांना जणू सत्तेची नशा चढली आहे. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. भाजपाचे खासदार नलीन कुमार कतील यांनी तर माजी पंतप्रधान राजीव गांधींची तुलना थेट गोडसे आणि दहशतवादी अजमल कसाबशी केली आहे.

गोडसेनं एकाला मारलं. कसाबनं ७२ जणांची हत्या केली. राजीव गांधींनी १७ हजार जणांना मारलं. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण?, असं ट्वीट कतील यांनी केलं. त्यांच्या या ट्वीटवर काही वेळातच जोरदार टीका झाली. आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी ते ट्वीट डिलीटही केले. त्यावर अधिकची कारवाई नको म्हणून त्यांनी दुसरे ट्वीट करत माफीही मागितली. माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेताच मी ट्विट हटवलं. आता यावरील चर्चा थांबवू या,’ असं ट्वीट त्यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधींवर टीका केली होती. काँग्रेसच्या दरबारातली नेतेमंडळी राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा करायची. पण नंबर भ्रष्टाचारी म्हणून त्यांचं आयुष्य संपलं, अशी टीका मोदींनी केली होती. पक्षाचा मुख्य चेहराच माजी पंतप्रधानांवर टीका करत असेल तर त्यांच्या नेत्यांकडून काय अपेक्षित आहे.

दरम्यान, देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत टीका करणे. त्यानंतर त्यावर माफी मागणे हा ट्रेंड झालाय की काय असं वाटत आहे. भाजपचे मंत्री बेताल वक्तव्य करतात आणि अंगाशी आले की माफी मागून मोकळे होतात. उद्या या मंत्र्यांच्या हातात भारताचे भवितव्य असणार आहे. जे काही बोलण्यापूर्वी कशाचे भान ठेवत नाहीत ते देशच कसा चालवणार, असा साधा प्रश्न सामान्यांना पडतो.

.

Leave a Comment