‘भाई’ पार्ट २ लवकरच…

संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा बायोपिक असलेला “भाई व्यक्ती कि वल्ली” या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित कण्यात आला आहे. ‘पुरश्या’, ‘पुरुषोत्तम’ ते “भाई” पर्यंतचा पु, लं चा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

पु.लं चा जीवनप्रवास दोन ते अडीच तासात दाखवता येणे शक्य नसल्याने महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची दोन भागांमध्ये निर्मिती केली आहे. ४ जानेवारी २०१९ रोजी चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला व तो प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला. आता महेश मांजरेकर या चित्रपटाचा दुसरा भाग ८ फेब्रुवारी २०१९ ला प्रदर्शित करत आहेत.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पु.लंचे साहित्य, नाट्य क्षेत्रातील अभिनेता आणि लेखक म्हणून असलेले योगदान, आकाशवाणीमधील नोकरी, सामाजिक क्षेत्रातील सहभाग ते उतारवयातील प्रवास अशा पुलंच्या विविध भूमिका पाहायला मिळणार आहेत.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment