भाजपमध्ये अंतर्गत कलह. अवनी वाघीणीवरून मनेका गांधी विरुद्ध फडणवीस मुनगंटीवार हल्ले प्रतिहल्ले

मुंबई: दोन दिवसांपूर्वी अवनी नावाच्या वाघिणीची वनखात्याकडून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या  आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य प्राणी प्रेमी व   निसर्गप्रेमी व्यक्तींनी        याविरोधात आवाज उठवला. सत्ताधारी  भाजपच्या खासदार व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी याविरोधात TWITTER द्वारे आपला रोष उपस्थित केला. त्यांनी वन पर्यावरण   मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला चढवत जाब विचारला आहे.


दरम्यान त्यांच्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून मुनगंटीवार  यांनी मिश्किल शब्दात खिल्ली उडवली आहे. त्यांनी मनेका गांधी यांना याविषयी कमी ज्ञात असून त्यामुळे त्यांची बडबड सुरु असल्याचे म्हणले.

या वादात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि उडी घेतली असून अवनी वाघिणीच्या मृत्यूच्या वेळी काय परिस्थिती हे तपासून बघितलं पाहिजे अस विधान करून मुनगंटीवार यांची पाठराखण केलेली आहे.

हा सर्व प्रकार अंबानी यांच्या प्रस्थापित सिमेंट कारखान्यासाठी झालेला असल्यामुळे सरकार मधील बिजनेस लॉबीशी संबंधित मंत्री व आमदार या हत्येचे समर्थन करताना दिसून येत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment