आर्य बाहेरचेच, जेनेटिक पुरावे मिळाले

पुणे : आर्य म्हणून ओळखले जाणारे लोक मूळ भारतीय की बाहेरचे हा भारतात नेहमीच एक वादाचा मुद्दा राहिला आहे. टिळकांपासून ते आताच्या इतिहासतज्ञांनी या मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडली आहेत.

आर्य भारतात येण्याआधीची हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा मूलाधार मानल्या जाते. मात्र ही संस्कृती सुद्धा आर्यांचीच होती असा दावा काही गटांकडून होत होता. आर्य भाषा अर्थात इंडो युरोपीयन भाषा ह्या इराण व युरोपमधून भारतीय उपखंडात आल्या की भारतात स्थायिक झालेल्या आर्यांनी तिकडे नेल्या याबद्दल मतभेद होते.

आर्य भारतात येण्याआधी इथे काही संस्कृती अस्तित्वात होती किंवा नाही, की त्यांनीच आज आपण जिला भारतीय संस्कृती म्हणतो तिची स्थापना केली या प्रश्नाचं उत्तर आता जेनेटिक तंत्राने मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हार्वर्ड विद्यापीठातील जेनेटिसिस्ट डेव्हिड रेक यांनी या प्रश्नावर मूलभूत संशोधन करून आपलं संशोधन जगासमोर आणलं आहे, जगभरातले ख्यातनाम 92 जेनेटिक संशोधक या प्रकल्पाचे सहलेखक आहेत. The Genomic formation of South and Central Asia या नावाने हे संशोधन प्रकाशित झालं आहे या संशोधनानुसार ..

1. इसवी सन पूर्व 7000 ते 3000 या कालावधीत इराणच्या जैग्रोस भागातून पशुपालकांचा एक मोठा समूह इंडस नदीच्या खोऱ्यात स्थिरावला, त्याआधी या भागात 65,000 वर्षांआधी OoA मायग्रंट ग्रुप अर्थात आउट ऑफ आफ्रिका ग्रुप या समूहातील लोक राहत होते. या दोन्ही समूहांनी मिळून हडप्पा संस्कृतीची स्थापना केली.

2. आज आपण ज्यांना आर्य म्हणतो, तो समूह या घटनेच्या हजारो वर्षांनंतर इसवी सन पूर्व 2000 साली या भागात येऊन स्थिरावला. हा समूह आज आपण ज्याला कजाखस्तान म्हणतो तिथून आला होता, यांना युरेशियन स्टेपी समूह असं म्हटलं जातं. घोडेस्वारी व संस्कृत भाषेचं प्राथमिक स्वरूप या समूहाने आपल्या बरोबर आणलं होतं.

आर्य बाहेरचे की इथले हा भारतात संशोधनाचा मुद्दा नसून राजकारणाचा मुद्दा आहे. जातीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काही समूह आपली वंशावळ आर्यांपर्यंत नेतात, मात्र आर्य बाहेरचे असू शकतात हे त्यांना मान्य होत नाही, खिझाडीच्या उत्खननातून पुढे आलेले पुरावे व या जेनेटिक संशोधनातून पुढे आलेले पुरावे यातून या वादावर पडदा पडेल अशी अपेक्षा करूया.

आर्य व आर्येतर वादावर आम्ही या आधी केलेला हा रिपोर्ट नक्की वाचा.
https://egnews.in/marathi-news/rss-troubled-by-excavation/

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

COMMENTS

Leave a Comment