अंबानी विरुद्ध कारवाई करू नये म्हणून सरकारचा दबाव, इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा आरोप.

 

सेंट्रल बोर्ड फोर टॅक्स चे चेअरमन प्रमोद चंद्रा मोडी यांनी मला अंबानी कुटुंबावर कारवाई करण्यापासून रोखले. असा आरोप टॅक्स डिपार्टमेंट मध्ये चीफ कमिशनर राहिलेल्या अलका त्यागी यांनी केला आहे. अलका त्यागी यांनी वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून याबाबत तक्रारही केली आहे.

त्यागी या 1984 बॅचच्या आय आर एस ऑफिसर आहेत. चंद्रा मोडी यांच्या बाबतीत आरोप केल्यानंतर, मोडी यांनी माझ्यावरची जुनी केस ज्यात मला क्लीन चिट खुद मोडीनीच दिली होती. ती केस त्यांनी रिओपन करून मला ब्लॅकमेल केले.

 

 

 

मी मोडी यांची पहिली तक्रार प्रिन्सिपल चीफ कमिशनर एस के गुप्ता यांच्याकडे केली होती. दोन महिने वाट पाहिल्यानंतरही माझ्या तक्रारीची कोणतीच दाखल घेतली गेली नाही. उलट मोडी यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला.

त्यागी यांनी त्यांच्या आरोपात असे ही म्हटले आहे की मोडी मला म्हणाले .

‘मी एक विरोधीपक्षाच्या नेत्याच्या बाबतीत बजावलेल्या कामगिरीच्या बदल्यात, मला सरकार कडून सेंट्रल बोर्ड फोर टॅक्सचं चेरमनपद बहाल करण्यात आलं आहे’

मला मोडी यांनी काही संवेदनशील केसेस ड्रॉप करण्यासाठी वारंवार सांगितले. मोडीनी मला फाईल पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले. त्या केस संदर्भात कोणताही रेकॉर्ड ठेवायचा नाही असेही सांगितले. फाईल बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने माझ्यावरती दबाव टाकला.

त्यागी यांच्या कार्यालयाद्वारे मूल्यांकन प्रकरणांमध्ये दीपक कोचर-आयसीआयसीआय बँक प्रकरण, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना ब्लॅक मनी अ‍ॅक्ट व जेट एअरवेज प्रकरणात नोटिसेस पाठविल्या गेल्या होत्या. या व्यतिरिक्त काही महत्वाच्या केसेस त्यागी हाताळत होत्या.

जे अधिकारी मोडी यांचे ऐकत नाहीत त्यांच्यामागे कोणती ना कोणती चौकशी लावण्यात येते. पत्रात त्यांनी असंही लिहिलं आहे, की मोडी यांनी मला एकदा मीटिंगसाठी रात्री पावणे नऊ वाजता त्यांच्या नोर्थ ब्लॉक मधल्या ऑफिसमध्ये बोलवले. मी त्या मीटिंगसाठी हजर राहिले नाही.
गेले चौतीस वर्षे एक महिला अधिकारी म्हणून मी डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. पण आजवर मला कोणी इतक्या विचित्र वेळेवर मीटिंगसाठी बोलवले नाही.

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांना लिहिलेल्या पत्रात त्यागी यांनी वरील सर्व गोष्टी नमूद केल्या आहेत.
मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की या सर्व गोष्टी मी जाहीर करेन. पण सीबीडीटी चे चेअरमन प्रमोद चंद्रा मोडी यांच्या वागण्यामुळे मला हे पाऊल उचलणे भाग पडले.

सध्या त्यागी यांची बदली झाली असून, त्या प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर, नागपूरच्या नॅशनल अकॅडमी ऑफ डिरेक्ट टेक्स मध्ये कार्यरत आहेत.
सीतारमण यांना पाठवलेल्या कम्प्लेंट ची कॉपी मी पंतप्रधान कार्यालय, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, कॅबिनेट सेक्रेटरी यांनाही पाठवलेली आहे असं त्यागी म्हणाल्या.

देशात सध्या अनेक स्वायत्त संस्थांच्या कामगिरीवरती अनेक प्रश्नचिन्ह उठवले जात आहेत. त्यातच सीबीडीटी मधील हा प्रकार उघडकीस आला आहे.

.

Leave a Comment