अखिलेश यादव यांना विमानतळावर रोखले…

अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला हजर राहण्याकरिता निघालेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विमानात बसण्यापासून मज्जाव करण्यात आला.
लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे प्रयागराज येथील विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण समारंभाला उपस्तिथ राहण्याकरिता विमानाने निघाले असताना, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात बसण्यापासून रोखले, याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांना याबद्दल काहीही सांगता आलेले नाही.

संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कानुसार, व्यक्तीला देशात कोठेही फिरण्याचा वा वास्तव करण्याचा अधिकार असताना अखिलेश यादव यांच्या बाबतीत घडलेली हि घटना लोकशाहीच्यादृष्टीने हानिकारक आहे.

या घटनेनंतर अलाहाबाद विद्यापीठाच्या रजिस्ट्रारनी देखील अखिलेश यादव यांच्या वैयक्तिक सचिवांना ‘विद्यापीठाच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला येण्यास मुभा नसल्याचे’ लिखित स्वरुपात कळवले आहे.

या एकंदरीत घटनेनंतर अखिलेश यादव यांनी हा ‘लोकशाहीच्या विरोधातील प्रकार असून, बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टी यांची झालेली महाआघाडी ओळखून
मोदी सरकारने अशा घटना मुद्दामहून घडवण्यास सुरुवात केली आहे. असे सोशल मिडीयावर व्यक्त होताना म्हंटले आहे.

या घटनेचा निषेध करताना बहुजन समाजवादी पार्टी च्या अध्यक्ष मायावती यांनीदेखील हा प्रकार लोकशाहीसाठी घटक असून केंद्रात व राज्यात असणारे भाजपा सरकार सर्वच पातळ्यांवर चुकीची वागणूक देत असल्याचे मत नोंदवले.

या घटनेबद्दल युवक क्रांती दलाचे संघटक संदीप बर्वे यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांनी ‘भाजपला विरोधी मत मांडणारी वा विरोधी विचारसरणी असणारी लोकं बौद्धिकदृष्ट्या चालत नसून, अमोल पालेकरांपासून ते अखिलेश यादव यांच्या बाबतीत घडलेल्या घटना या हेच सांगत आहेत,’ असे मत मांडले.

.

Leave a Comment