माझ्यावर टीका करण्याची दानवेची औकात आहे का? अजितदादांचा घणाघात

माळेगाव: दिवाळीच्या पूर्वसंध्येला बारामतीत राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या रांगड्या शैलीत फटकेबाजी करताना दिसून आले. काल माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगाम कार्यक्रमात  पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, चंद्रराव तावरे यांनी अजित पवार व कुटुंबियांवर टिकेची झोड उठविली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवारांच्या दारावर पोलिस असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असा इशारा दिला होता.

त्याला आज माळेगावातच अजित पवारांनी त्यांच्या गावरान शैलीत उत्तर देताना मोदि लाटेत फावलेल्या मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर यांच्यासह शेतकर्यांना शिवीगाळ करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या दानवेंची माझ्यावर टीका करण्याची औकात काय आहे असा टोला लगावला. सिंचन घोटाळ्यासंबंधी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महागाई बेरोजगारी फसलेली कर्जमाफी यांच्या पासून लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप वारंवार केले जात आहेत असेही ते म्हणाले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment