कार्यक्रमानंतर अजितदादांचे “सफाई अभियान”

पुण्यातील सहकारनगर येथे १० जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रम सुरु व्हायच्या आधीच थोड्या अंतरावर कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या लावलेल्या होत्या. मात्र सभेला एकत्र झालेला जनसमुदाय पाहता कचरा झालाच होता, मात्र ११ जून रोजी अजित पवार कार्यक्रमस्थळी गेले असताना त्यांना तिथे पाण्याच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या, हे पाहताच अजितदादांनी त्या बाटल्या स्वतः उचलायला सुरुवात केली, हे पाहून जमलेले कार्यकर्ते पुढे आले व त्यांनीही हे सफाई अभियान पूर्ण केले.

 

आपण वापरलेली जागा आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे या भावनेतून अजित पवारांनी साफसफाईला सुरुवात केली असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपाच्या सभेनंतर कार्यक्रमस्थळी झालेला कचरा हा चर्चेचा विषय ठरला होता, असे असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमानंतर झालेली साफसफाई परिसरातल्या नागरिकांना सुखावून गेली हे नक्की.

 

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

COMMENTS

Leave a Comment