निवडणुका झाल्या, मतदान झालं; आता पुन्हा इंधन वाढ!

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकांपूर्वी इंधनाच्या दरात कमालीची वाढ होताना आपण पाहिली. त्यामुळे सामान्य जनतेलाही खुप त्रास सहन करावा लागला. मात्र लकोसभा तोंडावर असल्याने सरकारने या दरात लागोलाग कपात केली आणि इंधनाचे दर कमी झाले. मात्र आता निवडणुका संपल्या आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली की काय असे वाटायला लागले आहे. कारण लोकसभा निवडणुकांचे मतदान होताच इंधनांच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.

निवडणुकांच्या मतदानापूर्वी इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या दरात ५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ९ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी ७६.७८ रुपये तर डिझेलसाठी ६९.३५ मोजावे लागणार आहेत.  मुंबई प्रमाणेच राजधानी दिल्लीत देखील इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीकरांना पेट्रोलसाठी ७१.१७ तर डिझेलसाठी ६६.२० रुपये मोजावे लागत आहेत.

केंद्र सरकारकने निवडणुकीच्या काळात इंधन दर वाढ करु नये अशा सूचना दिल्या गेल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. तर आज झालेली दरवाढ ही नियमित स्वरुपाची आहे, असा दावा इंधन कंपन्यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना इंधनांच्या दरात फारशी दरवाढ झाली नाही. मात्र निवडणुकांचे मतदान पार पडताच या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या दिवसात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मात्र याचा सर्व परिणाम सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

.

Leave a Comment