आमच्याविषयी

नमस्कार, EG न्यूज च्या मराठी पोर्टलवर आपले स्वागत आहे. बातमी मागची बातमी कव्हर करण्यासाठी EG न्यूजचा जन्म झाला. तुम्हाला दिवसभरच्या बातम्या देण्यासाठी कित्येक चॅनेल्स, पोर्टल्स, वृत्तपत्रं उपलब्ध असतील पण प्रत्येक बातमी मागचं कारण, बातमी मागची “अंदर की बात” तिचा तुमच्या आयुष्यावरील परिणाम, आणि एकंदर समाजावर तिचे होणारे परिणाम तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आम्ही कोण आहोत : आम्ही पत्रकारांचा एक समूह आहोत ज्याला देशातल्या मीडियाच्या स्वतंत्र, स्वायत्त वृत्तीची गरज समजली आहे. आम्ही एक सामान्य, लोकशाहीवादी आणि या देशावर निष्ठा असलेल्या सर्वसामान्य भारतीयांचा समूह आहोत, थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही तुमच्यासारखेच आहोत, अगदी तुम्ही आहोत

आमची काही मार्गदर्शक तत्त्वं:

१) सामाजिक मालकी : EG न्यूजची मालकी ही पूर्णपणे समाजाची असेल, संपादक मंडळ हे फक्त ट्रस्टी म्हणून, विश्वस्त म्हणून काम बघेल, कुठल्याही लोकशाहीवादी समाजाला एका निर्भीड आणि स्वतंत्र मीडियाची गरज असते, आणि कॉर्पोरेट फंडिंगवरचा मीडिया हा स्वतंत्र राहू शकत नाही याची आम्हाला कल्पना व अनुभव आहे. म्हणून ज्या समाजाला हा मीडिया हवा आहे, त्यांनीच तो मीडिया उभा करावा, चालवावा या विचारांवर आमचा विश्वास आहे. म्हणून पूर्णपणे पब्लिक फंडिंगवर EG न्यूज उभं राहिल आणि चालेल याची दक्षता संपादक मंडळ घेईल.

२) फेक न्यूज : फेक न्यूज तसेच गोंधळ उडवणाऱ्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या तसंच जातीय धार्मिक तणाव बळकट करणाऱ्या बातम्या तुम्हाला या पोर्टलवर कधीही दिसणार नाहीत. बाकीच्या माध्यमांनी जर असं कंटेंट आधीच शेअर केलं असल्यास त्या न्यूजचा मागोवा घेतानाच तसं कंटेंट आम्ही शेअर करू. EG न्यूज सतत सामाजिक सलोखा व एकात्मतेच्या बाजूने उभं राहिल याची काळजी आम्ही घेऊ. तसंच आम्ही कुठलाही कॉपीराईट भंग करणार नाही व कुणाच्या वैयक्तिक अवकाशाचा भंग होईल असे कंटेंट शेअर करणार नाही.

३) कायदा, सुव्यवस्था आणि शासन : EG न्यूज सतत सरकारी धोरणांच्या सावध चिकित्सेच्या बाजूने असेल, सामान्य मतदार, ग्राहक, युवक, विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस व शासन किंवा राज्यकर्ता पक्ष यांच्यात कधीही संघर्ष उपस्थित झाल्यास आम्ही सर्वसामान्य माणसांच्या हक्कपूर्तीसाठी उभे असू, कारण स्वतंत्र मीडिया हा समाजाच्या मालकीचा असतो, सरकारच्या हातातील खेळणं नसतो. EG न्यूजचं संपादक मंडळ हे न्याययंत्रणेचा सन्मान करेल व स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या बाजूने उभं राहील.

४) जाता जाता, तुम्ही पाहिल्याप्रमाणे EG न्यूज मराठीची भाषा ही आजचा युवावर्ग बोलतो ती मराठी असेल, गरज असेल तिथे सोपा इंग्रजी शब्द सोडून आम्ही क्लिष्ट मराठी वापरण्याच्या भानगडीत पडणार नाही. भाषा हे संवादाचे, माहितीच्या आदानप्रदानाचे माध्यम म्हणून वापरण्याचा आमचा उद्देश आहे. EG न्यूजचं इंग्रजी पोर्टल लवकरच सुरू होईल, तिथेही व्यवहारातल्या सर्वमान्य इंग्लीशचा वापर होईल.

५) नावाबद्दल : EG हे नाव एडवर्ड ग्लोबल या नावापासून आले आहे. प्रसारमाध्यमे समाजमनाला कसं प्रभावित करू शकतात याचा गहन अभ्यास करणारा एडवर्ड बार्नेज अमेरिकेत होऊन गेला, त्याच्या स्मरणार्थ हे नाव ठेवण्यात आलं आहे.

तुम्ही आम्हाला मदत करू शकता : स्वतंत्र व निर्भीड मीडिया लोकशाहीसाठी आवश्यक असतो, त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, आम्हाला आर्थीक मदत करण्यासाठी एक लिंक आम्ही लवकरच जारी करू, तिथून तुम्ही आम्हाला ही मदत पाठवू शकता, जर तुम्ही आर्थिक मदत करू शकत नसाल तर आमच्या बातम्या शेअर करून, मित्रांपर्यंत यांच्या लिंक्स पोहचवून सुद्धा तुम्ही आम्हाला हातभार लावू शकता.

संपर्क: – editor@egnews.in

आमचा पत्ता :

EGnews LLC

70, Kemble Street,

Boston, Massachusetts 02119

USA.

सर्व न्यायालयीन प्रकरणे बॉस्टन न्यायक्षेत्राअंतर्गत

आमच्या होमपेज ला भेट देण्यासाठी

https://egnews.in/marathi-news/ वर क्लीक करा.