विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह संपूर्ण युनिटचा सन्मान

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. पुलवामा हल्ल्यात झालेल्या शहिदांचा बदला भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरु झाल्या. त्यात २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या काही विमानांनी भारतात घुसखोरी केली. त्यांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ लढावू विमानाने पाकिस्तानच्या एफ-१६ लढावू विमानाला हाणून पाडले. त्यावेळी मिग-२१ विमानही कोसळले. तेव्हा अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत पडले. त्या प्रसंगाला मोठ्या शौर्याने ते सामोरे गेले.

अभिनंदन यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे व त्यांच्या युनिटचे कौतुक करून सन्मान करण्यात आला आहे. अभिनंदन वर्धमान यांचे युनिट मिग २१ बाइसन स्क्वॉड्रनला ‘फाल्कन स्लेयर्स’ आणि ‘एम्राम डॉजर्स’ या शीर्षकांसहीत पट्टा बहाल करत त्यांचा सन्मान करण्यात आलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. भारतीय वायुसेनेच्या ५१ स्क्वॉड्रनला देण्यात आलेल्या नव्या पट्ट्यांमध्ये एक मिग-२१ सोबत लाल रंगाचा एफ-१६ दिसत आहे. तर पट्ट्याच्या वरच्या बाजुला ‘फाल्कन स्लेयर्स’ तर खालच्या बाजुला ‘एम्राम डॉजर्स’ असं लिहिण्यात आलंय.

वायूसेनेने अभिनंदन यांच्या युनिटचे कौतुक तर केलेच आहे. त्यासोबतच वायुसेनेकडून अभिनंदन यांनी वीरचक्र पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भारताने पुलवामा हल्ल्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये असलेल्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला केला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानच्या लढावू विमानांनी भारतात घुसखोरी करत जम्मू-काश्मीरमधल्या अनेक सैन्य शिबिरांना निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी पाकिस्तानचा हा डाव हानून पाडला. तेव्हा पाकिस्तानचे ताकदीचे विमान एफ-१६ हे अभिनंदन यांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले. तेव्हा त्यांनी ती परिस्थीती व्यवस्थीतपणे हाताळली. पाकिस्तानकडून त्यांना बंदी करण्यात आले. मात्र भारताच्या आणि इतर राष्ट्रांच्या दबावामुळे पाकिस्तानने अभिनंदन यांना सुखरुप मायदेशी सोडले. येथे खरी भारताची ताकद जगाने पाहिली. त्यामुळे अभिनंदन यांच्या साहसाचे, धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

.

Leave a Comment