अलर्ट : 2000 च्या नोटांची छपाई बंद

नवी दिल्ली : नोटबंदीच्या काळात चलनात आणलेल्या २००० च्या नोटांची छपाई कमीत कमी प्रमाणात करण्यात येत असून, लवकरच या नोटांची छपाई पूर्णपणे बंद करण्याचा विचार आरबीआय करते आहे. मोठ्या नोटा या काळा पैसा व अवैध व्यवहारात मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन व्यवहारात या नोटांचा फारसा सहभाग नसतो, मात्र केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचे पगार व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्रीचे पैसे मोठ्या नोटांच्या स्वरूपात दिले जात होते, यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

“द प्रिंट” या संकेतस्थळाला विश्वसनीय सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटांचे व्यवहारातले स्थान नगण्य असल्याने छपाई बंद केली तरी बाजारात काही विशेष फरक पडणार नसल्याने आरबीआय ने हा निर्णय घेतला आहे. एका आदर्श परिस्थितीत नोटांचे व्यवहारातले प्रमाण हे असे ठेवले जाते कि व्यवहारातली जास्त वापरली जाणारी रक्कम हि जास्तीत जास्त तीन चलनांच्या नोटा वापरून हस्तांतरित करता आली पाहिजे. प्रगत राष्ट्रात दोन जवळचे मूल्य असलेल्या नोटांचे चलन मूल्य १:२ किंवा १:२.५ इतके असते. याच प्रमाणात नोटा छापल्या व वितरीत केल्या जातात. भारतात नोटबंदीच्या नंतर हे प्रमाण पूर्णपणे विस्कटले होते. आता आरबीआय पुन्हा हेच प्रमाण पहिल्यासारखे करण्याचा प्रयत्न करते आहे.

नोटबंदीच्या काळात, २००० ची नोट आधी वितरीत करण्यात आली, सरकारच्या या निर्णयावर मोठी टीका झाली होती. नेमकी ज्या हेतूसाठी नोटबंदीची घोषणा करण्यात आली त्याच हेतूंना हरताळ फासणारी हि मोठी नोट होती. या नोटेने मोठ्या रकमांचे व्यवहार सुरळीत झाले असले तर सर्वसामान्य लोकांना या नोटांनी सतावले होते. आजही कित्येक एटीएम नोटा डीस्पेंस करताना मोठ्या चलनी नोटा देतात व त्याने अडचणी निर्माण होतात. एप्रिल २०१८ ला निर्माण झालेला नोटांचा तुटवडा हा मोठ्या चलनाच्या नोटांची साठवणूक केल्याने निर्माण झालायचे आयकर विभागाने घातलेल्या धाडीतून स्पष्ट झाले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment