पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टरची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने केले निलंबित

पंतप्रधानांच्या हेलीकॉप्टरची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने केले निलंबित

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोग सर्वांवर लक्ष ठेवून असते. मात्र निवडणूक आयोगाने एखा आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. मोहम्मद मोहसिन असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते कर्नाटकमधील १९९६च्या बॅचचे आहेत. मोहसिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना निलंबित केल्याचे वृत्तच समोर आले आहे. मोहसिन यांनी ओडिसा राज्यात संबलपूर येथे इलेक्शन जनरल निरिक्षक म्हणून…

पुढे वाचा ..

मोदींचा तुघलकी फतवा आणि अर्धा कोटी जनता बेरोजगार!

मोदींचा तुघलकी फतवा आणि अर्धा कोटी जनता बेरोजगार!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाचवर्षात अनेक मोठमोठे निर्णय घेतले. त्यामुळे झालेल्या त्रासाला सामान्य जनतेला समोर जावे लागले. त्यात मोदींनी २०१४ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर दर वर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. मात्र मोदींच्या एका निर्णयाने क्षणार्धात ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्याचे समोर आले आहे. बंगळुरुमधील अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंटनं (सीएसई) काल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात यासंदर्भात लिहीण्यात आले आहे. बंगळुरुतल्या अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ…

पुढे वाचा ..

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

‘आधी गुजरात, मग देश’ नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम

नवी दिल्ली : काल देशात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत या पावसात गारपीटही झाली. या पावसाने देशभरात तब्बल ३५ ते ४० जणांचे प्राण घेतले. तर अनेक राज्यांत शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मध्य प्रदेशात तब्बल १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर गुजरात आणि राजस्थानमध्ये अनुक्रमे ११ आणि ७ जणांचा बळी या पावसाने घेतला. तर महाराष्ट्रातही वीज पडून एका शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत….

पुढे वाचा ..

आपल्या शिक्षणावर बोलताना स्मृती इराणींचा जुना व्हीडिओ; एकदा पहाच

आपल्या शिक्षणावर बोलताना स्मृती इराणींचा जुना व्हीडिओ; एकदा पहाच

मागील काही सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय म्हणजे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अमेठीतून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून. कारण २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना पदवीधर असल्याचे म्हटले होते. ओपन लर्निंग विद्यापीठातून तीन वर्षांची पदवी घेल्याचे स्मृती इराणींनी म्हटलं होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता त्यामुळे वादही निर्माण झाले होते. तेव्हा इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर काल स्मृती इराणी यांनी लोकसभेसाठी पुन्हा एकदा अर्ज केला. २०१४…

पुढे वाचा ..

लोकसभा निवडणूक २०१९: निवडणूक प्रचारातील “सैनिक”

लोकसभा निवडणूक २०१९: निवडणूक प्रचारातील “सैनिक”

लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या भारतात आहे. त्यामुळे आपल्या पक्षांचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. या प्रचारांच्या रणधुमाळीत प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या गोष्टींचे श्रेय घेत असतो, हे आपण पाहतोच. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच चांगल्या कामाचे श्रेय घेतात. मग ते कोणी दुसऱ्याने केलेले असोत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय वायु सेनेनं पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला. तसंच उरी हल्ल्याचाही भारतीय सेनेने बदला घेतला. या मुद्यांवर मोदी नेहमीच छाती ठोकून बोलत असतात….

पुढे वाचा ..

शिवसेनेचा भगवा रंग का हटवला?; शिवसैनिकांसह नेटकरी नाराज

शिवसेनेचा भगवा रंग का हटवला?; शिवसैनिकांसह नेटकरी नाराज

मुंबई :  लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. या लोकसभेला अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात लक्ष खेचून घेणारी म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती. कारण गेल्या ५ वर्षांत शिवसेनेनं भाजपविषयी नेहमीच गरळ ओकली. स्वबळावर लढण्याचा नारा दिला. मात्र हे सर्व बाजूला सारत त्यांनी भाजपशी गळाभेट केली. त्यानंतर मात्र शिवसेना आता भाजपची री ओढत नाहीएना असं वाटू लागले आहे. कारण शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरील प्रोफाईल बदलण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं या प्रोफाईलमधील फोटोत…

पुढे वाचा ..

”भाजपला मतदान करू नका”, म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या

”भाजपला मतदान करू नका”, म्हणत शेतकऱ्याची आत्महत्या

डेहरादून : देशात सर्वाधिक महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय शेतकऱ्यांची आत्महत्या हा आहे. त्यासाठी मोदी सरकार रोज नवनव्या योजना आणत आहे. मात्र उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोटमध्ये “भाजपला मतदान करू नका”, असं आवाहन केले आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ईश्वरचंद्र शर्मा असे आहे. ते ६५ वर्षांचे होते. मंगळवारी पाहटे विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली. हरिद्वार जिल्ह्यातील दडकी गावातील ते रहिवासी होते. त्यांनी विष घेतल्यानंतर तात्काळ त्यांना…

पुढे वाचा ..

शिवसेनेनं केला कोकणचा आयर्लंड; सोशल मीडियावर ट्रोल

शिवसेनेनं केला कोकणचा आयर्लंड; सोशल मीडियावर ट्रोल

रत्नागिरी : लोकसभा निवडणूकीत प्रचाराचे वारे जोर धरत आहेत. प्रचारासाठी कोण कोणती शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. पोस्टर हे प्रचारासाठी महत्वाचे मानले जातात. त्यामुळे लोकांच्या नजरा नेत्यांच्या पोस्टरवर असतातच आणि त्यात ते काय काय वापरतात हेही लोक बारकाईने पाहतात, याची प्रचीती आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील विद्यमान खासदार आणि भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे आहेत. गेल्या ५ वर्षात कोकणातील विकास दाखवण्यासाठी यांनी एक जाहिरात केली होती. ती लोकांच्या डोळ्यात आली आहे.  ही जाहिरात म्हणजे एक पोस्टर…

पुढे वाचा ..

राफेल प्रकरणी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक

राफेल प्रकरणी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजत असलेल्या मुद्यांपैकी एक म्हणजे राफेल विमान खरेदीचा करार आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला जोरदार झटका दिला आहे. राफेल प्रकरणावर फेरविचार करण्याची याचिका केंद्र सरकारने न्यायालयाकडे दिली होती. मात्र गहाळ झालेले दस्तावेज वैध असून, फेरविचार याचिकेवर नव्या दस्तावेंजाच्या आधारे सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. संरक्षण मंत्रालयातून राफेल करारासंबंधीचे महत्त्वाचे गोपनीय दस्तावेज गहाळ झाले होते. त्या…

पुढे वाचा ..

बारामती लोकसभा मतदारसंघ:सुप्रिया सुळे उवाच!

बारामती लोकसभा मतदारसंघ:सुप्रिया सुळे उवाच!

भारतातील निवडणुकांच्या राजकारणात लोकसभेच्या अशा काही ठराविक जागा आहेत त्या जागांवर तेथील प्रस्थापित राजकारण्यांशिवाय इतर कोणी निवडून येणं हे जवळ जवळ अशक्य आहे.त्यामध्ये उत्तरप्रदेशातील अमेठी-रायबरेली,मध्यप्रदेश मधील छिंदवाडा,आणि महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघ येतात.2014 च्या तथाकथित मोदी लाटेत सुद्धा विरोधक ह्या मतदारसंघांना खिंडार पाडू शकले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो.2009 पासून त्यांच्या कन्या सौ. सुप्रिया सुळे ह्या या मतदारसंघांच संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. भारतात सध्या लोकसभा…

पुढे वाचा ..
1 2 3 42