शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही – पंतप्रधान मोदी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही  – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत आम्ही शेतकऱ्यांसाठी इतकं काम केलं आहे की आता कर्जमाफी द्यायची गरज उरलेली नाही. सॉईल हेल्थ कार्ड, एफआरपी, निम कोटेड युरिया या योजनांमुळे शेतकरी आता सक्षम झालेला आहे. वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी कर्जमुक्त करण्यावर माझ्या सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी आज सांगितले. ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत देत असताना मोदींनी हे विधान केले. देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आपल्या पातळीवर कर्जमाफी देईल का असा प्रश्न त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

पुढे वाचा ..

कर्जमाफी फेल, राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

कर्जमाफी फेल, राजू शेट्टी यांची सरकारवर टीका

शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य हमीभाव मिळावा तसेच दुधाला प्रतिलिटर अनुदान मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. सरकारची कर्जमाफीची योजना फोल ठरली असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला नाही. बोगस कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीपाला व दुधाला योग्य दर मिळण्यासाठी लोकसभेत कायदा असावा म्हणून बिल तयार करण्यात आले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे बिल मंजूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढे वाचा ..