“मोदिजी तो रणगाडा नाही” कॉंग्रेसने उडवली मोदींची खिल्ली

“मोदिजी तो रणगाडा नाही” कॉंग्रेसने उडवली मोदींची खिल्ली

हाजिरा येथे L&T कंपनीच्या चिलखती वाहनांच्या विभागात प्रधानमंत्री मोदींनी आज फोटोसेशन केले. तिथे असताना त्यांनी एका वाहनात बसून चक्करहि मारली. थोड्या वेळाने त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून एक ट्वीट करण्यात आले ज्यात त्यांनी ज्या वाहनातून चक्कर मारली ते वाहन एक TANK अर्थात रणगाडा असल्याचे म्हटले होते. Checking out the tanks at L&T’s Armoured Systems Complex in Hazira. pic.twitter.com/zf7wRrbX7Y — Narendra Modi (@narendramodi) January 19, 2019 मात्र ते वाहन रणगाडा नसून एक स्वयंचलित होवित्जर तोफ होती. ह्याच…

पुढे वाचा ..

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

आलनार, दांतेवाडा, (छत्तीसगड) : नक्षली समस्यांनी ग्रस्त असलेल्या आलनार या गावातील आदिवासी समाजाच्या सामुहिक मालकीची असलेली शेकडो एकर जमीन एका रात्रीत आरती स्पंज एन्ड पावर लिमिटेड या कंपनीच्या मालकीची झाली. आदिवासी वनजमीन हक्क कायद्याअन्वये आदिवासी पाड्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर स्थानिक आदिवासींची सामुहिक मालकी असते. गावातले सर्व सज्ञान नागरिक सभासद असलेल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय ह्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प उभारता येत नाही. आलनार ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी आरती स्पंज कंपनीला आपली वनजमीन देण्याचा विरोध केलेला असतानाही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मंजुरी मिळाल्याचे…

पुढे वाचा ..

… आणि कमलनाथांच्या एका इशाऱ्यावर दंगलखोर शांत झाले.

… आणि कमलनाथांच्या एका इशाऱ्यावर दंगलखोर शांत झाले.

नवी दिल्ली: १ नोव्हेंबर १९८४ ची ती सकाळ होती, इंदिरा गांधींची हत्या होऊन दुसराच दिवस उजाडला होता, तीन मूर्ती भवनात गोळ्यांनी चाळण झालेला त्यांचा पार्थिव देह दर्शनासाठी ठेवलेला होता. त्यांना तसं पाहून कॉंग्रेसजन धाय मोकलून रडत होते. त्यांचे अंगरक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या दोघा शीख जवानांनीच त्यांची हत्या केली होती. “ खून का बदला खून” अश्या घोषणा देण्यात येत होत्या. तीन मूर्ती भवनाच्या अगदी समोर राकाब गंज गुरुद्वारा आहे, तीन मूर्ती भवनातून आपल्या लाडक्या इंदिरामायचे अंतिम…

पुढे वाचा ..

भाजप-पीडीपी युतीमुळे जम्मू काश्मीरमधील शांततेचा भंग : कॉंग्रेस

भाजप-पीडीपी युतीमुळे जम्मू काश्मीरमधील शांततेचा भंग : कॉंग्रेस

भाजपने पीडीपीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्यानंतर कॉंग्रेसने भाजपवर टीका केली. भाजप-पीडीपी युतीमुळे जम्मू  आणि काश्मीरमधील शांतता भंग पावली असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. मेहबूबा मुफ्तींच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देत कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाल म्हणाले, ‘भाजप आणि पीडीपी यांच्या युतीमुळे काश्मीरमधील शांतता नष्ट झाल्याचे संपूर्ण देशाने अनुभवले आहे.’ तसेच ‘या भूमीवर आपले जवान शहिद झाले आहेत. ४ वर्षांमध्ये मोदींचे काश्मीरसंबंधीत धोरण…

पुढे वाचा ..

बुलेट ट्रेन हि प्रत्यक्षात न येणारी ‘मॅजिक ट्रेन’: राहुल गांधी

बुलेट ट्रेन हि प्रत्यक्षात न येणारी ‘मॅजिक ट्रेन’: राहुल गांधी

सर्वात जास्त चर्चेत असलेला ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्प हा ‘जादुई ट्रेन’ सारखा आहे जो प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे. सीमेवर डोकलामसारखे प्रश्न असताना मोदी चीनच्या अध्यक्षांबरोबर झोक्यावर बसलेले दिसतात अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. यावेळी त्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही सवाल केला. राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धींगाई गावामधील सरकारी केंद्रात पिक विक्रीची वाट बघत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट दिली.

पुढे वाचा ..

राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसचा आरोप

राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसचा आरोप

दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सर्जिकल स्ट्राईक च्या मुद्द्यावरून मोदी आणि भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. १८ सप्टेंबर २०१६ मध्ये उरीतील लष्करी कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ११ दिवसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळे उद्धवस्त केली होती. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले सर्व जवान नंतर सुरक्षितपणे भारतात परतले होते. या कारवाईचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एकीकडे मोदी सरकार या लष्करी…

पुढे वाचा ..

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांना भाताच्या वाणाचे पेटंट मिळावे

खोब्रागडे यांनी शोधलेल्या तांदळाच्या जातींना पेटंट मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी,असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. चन्द्रपूरमधील खोब्रागडे यांच्या कुटुंबाला काल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिली, असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले. खोब्रागडे कुटुंबीयांनी राहुल यांच्यासोबत चर्चा करताना हि मागणी केली. आम्ही नक्कीच या गोष्टीचा आढावा घेत आहोत. तांदळाच्या ९ जातींचे पेटंट, चंद्रपूरमध्ये धान्य   संशोधन केंद्र उभारण्यासाठीची मदत तसेच कुटुंबातील २ जणांना शासकीय नोकरी मिळावी या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. भातशेतीमध्ये क्रांतिकारक काम करणाऱ्या खोब्रागडे…

पुढे वाचा ..

जनतेसोबत युती , आंध्रमध्ये कॉंग्रेसचा नारा

जनतेसोबत युती , आंध्रमध्ये कॉंग्रेसचा नारा

जनतेसोबत युती हे आंध्रमध्ये कॉंग्रेसपक्षाचे घोषवाक्य असणार आहे ,असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव उम्मन चंडी म्हणाले. आंध्र प्रदेशात कॉंग्रेसने इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी कॉंग्रेस कार्यकारी कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. आम्हाला माहिती आहे हे कार्य आव्हानात्मक आहे, पण तरीही आम्ही जनतेसोबत लढून पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा मिळवू असे त्यांनी सांगितले. भाजपने आंध्रप्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, भाजपची हि खेळी लोकांनी ओळखली आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे अशा शब्दात त्यांनी…

पुढे वाचा ..

कॉंग्रेस पक्षच सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतो : जयंत चौधरी

कॉंग्रेस पक्षच सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतो : जयंत चौधरी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष हा आघाडी वाढविण्यास भाजपापेक्षा अधिक सक्षम आहे. असे विधान राष्ट्रीय लोकदल पक्षाचे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी यांचे नेतृत्व हे २०१९ निवडणूकीसाठी सर्व विरोधीपक्षाना एकत्र आणण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल ,असा दावा त्यांनी केला आहे. कैराना येथे झालेल्या पोटनिवडणुकीतील विजय म्हणजे सर्व विरोधीपक्षांनी एकत्रित व्हावे, असा संदेश जनतेने दिला आहे, असे जयंत चौधरी म्हटले. तसेच पुढे बोलताना ते म्हटले की, ज्याना आपला राजकीय दरारा टिकवून ठेवयाचा आणि कायम…

पुढे वाचा ..