..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

आलनार, दांतेवाडा, (छत्तीसगड) : नक्षली समस्यांनी ग्रस्त असलेल्या आलनार या गावातील आदिवासी समाजाच्या सामुहिक मालकीची असलेली शेकडो एकर जमीन एका रात्रीत आरती स्पंज एन्ड पावर लिमिटेड या कंपनीच्या मालकीची झाली. आदिवासी वनजमीन हक्क कायद्याअन्वये आदिवासी पाड्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर स्थानिक आदिवासींची सामुहिक मालकी असते. गावातले सर्व सज्ञान नागरिक सभासद असलेल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय ह्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प उभारता येत नाही. आलनार ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी आरती स्पंज कंपनीला आपली वनजमीन देण्याचा विरोध केलेला असतानाही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मंजुरी मिळाल्याचे…

पुढे वाचा ..

नेतृत्वाने पराभवाचे ही श्रेय घ्यावे : नितीन गडकरी

नेतृत्वाने पराभवाचे ही श्रेय घ्यावे : नितीन गडकरी

पुणे: मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगड निवडणुकांचे निकाल भाजपच्या विरोधात गेल्यानंतर आता नरेंद्र मोदी अमित शहा आणि पर्यायाने भाजपला उतरती कळा लागली आहे. पक्षांतर्गत नेतृत्व बदलाची मागणीही आता जोर धरू लागली आहे. मध्यंतरी निवडणूक निकाल लागल्यानंतर लागलीच नितीन गडकरी यांचे नाव मोदींना पर्याय म्हणून पुढे आले होते करो राजतिलक की तयारी आ रहे है नितीन गडकरी अशा घोषवाक्यांसह सोशल मीडिया ही दणाणून निघाले होते. आज पुण्यात पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना…

पुढे वाचा ..

EGNews Exclusive “सर्जिकल स्ट्राईकच्या प्रचारामुळे पाकचा फायदा” लेफ्टनंट जनरल हुडा.

EGNews Exclusive “सर्जिकल स्ट्राईकच्या प्रचारामुळे पाकचा फायदा” लेफ्टनंट जनरल हुडा.

“सर्जिकल स्ट्राईकच्या प्रसिद्धी मुळे पाकिस्तानी सैन्याचा फायदाच झाला, दहशतवादी हल्ला झाल्यावर भारतीय सरकार उत्तर देण्याचा दबावाखाली येईल हे त्यांना आता समजलं आहे.” असंही विधान त्यांनी केलं.

पुढे वाचा ..

“जय अमित शहा” प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती.

“जय अमित शहा” प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय अमित शहा यांनी न्यूज वेबसाईट “द वायर” विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. देशात भाजपच सरकार आल्यानंतर जय शहा यांची पन्नास हजार रुपये भांडवलावर सुरु केलेली कंपनी एका वर्षातच ८० कोटी रुपये नफा कसा दाखवू शकते याबद्दल या वेबसाईटने एक स्टोरी केली होती. हि स्टोरी प्रकाशित झाल्याबरोबर द वायर या वेबसाईटला हि स्टोरी काढण्याची नोटीस पाठवली गेली होती. मात्र तसे न झाल्याने, या…

पुढे वाचा ..

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँकेकडून किती लोन घेतले ?

सोशल मिडीयावर सध्या एक मेसेज खूप व्हायरल होतोय ज्यात म्हटलं जातंय कि मोदींच्या कारकिर्दीत म्हणजे गेल्या चार वर्षात भारताने वर्ल्ड बँक कडून एकही रुपया कर्ज घेतलेलं नाही. हि पोस्ट खरी आहे कि खोटी हे बघण्यासाठी आम्ही थेट वर्ल्ड बँकेच्या वेबसाईट वर जाऊन चेक करायचं ठरवलं .. मोदी १६ मे २०१४ रोजी देशाचे पंतप्रधान झाले, म्हणून जून २०१४ ते जून २०१८ या कालखंडात वर्ल्ड बँकेने दिलेले कर्ज आम्ही कॅल्क्युलेट करायचे ठरवले. वर्ल्ड बँकेच्या http://projects.worldbank.org/ या साईटवर जाऊन…

पुढे वाचा ..

त्या व्हिडीओमुळे भाजपचीच नाचक्की

त्या व्हिडीओमुळे भाजपचीच नाचक्की

राजस्थान चे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर गाजतोय, पाण्यापासून जर विद्युत निर्मिती केली तर त्या पाण्यात असलेली सर्व शक्ती निघून जाईल व ते पाणी मग शेतासाठी काय उपयोगाचे अशा अर्थाचं एक वाक्य अशोक गेहलोत बोलत असल्याचं त्या व्हिडीओत दिसून येतं, वास्तविक पाहता श्री. अशोक गेहलोत हे जोधपुर विद्यापीठासारख्या एका नामांकित युनिव्हर्सीटीचे B.SC., M.A (Economics), व L.L.B. आहेत. राजस्थान सारख्या राज्याचे एक उच्चविद्याविभूषित माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते….

पुढे वाचा ..

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

अमित शाह मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची घेणार भेट

मुंबई : पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी म्हणून  संपर्क अभियान सुरू केले आहे. २०१९ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपावर नाराज असणाऱ्या पक्षाची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली आहे. संपर्क अभियानाअंंतर्गत बुधवारी अमित शहा हे भाजपाचे जुने मित्रपक्ष आणि मागील काही दिवसापासून नाराज असलेल्या शिवसेना पक्षाचे उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. मागील काही पोटनिवडणुकीत भाजपाला यश मिळाले नाही. मात्र पालघरमध्ये त्यांनी यश प्राप्त केले होते….

पुढे वाचा ..

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनता “जनार्दन” की रेड्डी “जनार्दन”

जनरल थिमय्या पासून विश्वेश्वरय्या पर्यंत वळणं घेत निघालेली कर्नाटकची प्रचारमोहिम थांबली, भारताच्या इतिहासातली आजपर्यंतची सर्वात महागडी विधानसभा निवडणूक म्हणून या निवडणुकीची नोंद घेतल्या जाईल. पंतप्रधान सगळ्याच निवडणूक मोहिमांत दिसतात तसे याही वेळेस आक्रमक आणि उत्साही दिसले, आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि टीकाकौशल्याने त्यांनी मैदान गाजवलं खरं पण तरीही बहुमताचा आकडा गाठायला ते कमीच पडले. विशेष म्हणजे या प्रचारमोहिमेत मोदींनी केंद्र सरकारचं एकही काम सांगितलं नाही. नोटबंदी आणि जीएसटी कराची अंमलबजावणी हे जे त्यांचे दोन महत्वाचे प्रकल्प…

पुढे वाचा ..