मोदींना मनी ऑर्डर पाठवली म्हणून शेतकर्यावर कारवाई; ब्रिटीश राजवटीचा अनुभव

नाशिक : चालू हंगामात कांद्याला अवघा १ रुपया ४० पैसे भाव मिळाल्याने उद्विग्न झालेल्या शेतकर्याने पंतप्रधान कार्यालयाला मनी ऑर्डर पाठवली. शेतकर्यांच्या समस्या व कष्टाचे मोल कळावे अशी प्रामाणिक भावना यामागे शेतकरी संजय साठे यांची होती. परंतु सत्ताधार्यांनी याचा वेगळा अर्थ काढत त्यांच्यामागे आता प्रशासन आणि चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

संजय साठे यांनी सादर कृत्य हे प्रसिद्धी स्टंट म्हणून तर केले नाही ना? कि कोणत्या पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी केले? त्यांचे राजकीय संबंध आहेत का? अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकारी प्रशासन गोळा करत आहे. लासलगाव बाजार समितीने यासाठी दोन पानांचा अहवाल सादर केलेला आहे.

त्या अहवालानुसार सद्या लाल कांद्याची आवक सुरु असून साठे यांचा उन्हाळ्यातील साठवून ठेवलेला कांदा असून त्याला लाल रंग नाही.तसेच तो काळा पडलेला असल्यामुळे त्याला भाव मिळाला नाही असा खुलासा करण्यात आला आहे.त्यादिवशी लासलगाव बाजारसमिती तसेच उपबाजारात झालेले लिलाव त्यांचे भाव याचा तक्ता जोडलेला आहे.

संबंधित अहवाल समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने शेतकरी संजय साठे यांना तीव्र मनस्तापला सामोरे जावे लागत आहे. पडलेल्या बाजार भावाचे खापर आपल्या कांद्याच्या दर्जावर  फोडल्याने त्यांनी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्याजवळ आपली  तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी होळकर यांनी अशा प्रकारचा कोणताही अहवाल बाजार समितीकडून दिला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट उन्हाळ कांद्यासाठी आपणच बाजार समिती मार्फत ५०० रुपये क्विन्टल अनुदान मागणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान साठे यांनी आपल्या ट्रक्टरवर नरेंद्र मोडी यांना उद्देशून शेतकर्यांच्या भावना लिहिलेला फलक लावल्यामुळे यामागील कारवाईचा बडगा भाजप सरकारने उगारल्याची चर्चा बाजार समितीतील सामान्य शेतकर्यांच्या मध्ये दिसून आली. सरकारच्या सदरील कृत्यामुळे शेतकरी वर्गातील नाराजीत भर पडल्याचे दिसून आले.

दिल्ली येथील लाखो शेतकर्यांचे आंदोलन अजून शमले नाही. त्यातच शेतकर्याने विरोधात मत व्यक्त केल्यामुळे कारवाईचा  बडगा उगर्ल्यामुळे हे सरकार नेमक स्वतंत्र भारताचे आहे कि ब्रिटीशांचे अशी भावना समज मनात दिसून येत आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment