पेट्रोलच्या दरकपातीचा खाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, बँकेत गर्दी वाढली

पेट्रोलच्या दरकपातीचा खाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, बँकेत गर्दी वाढली

दिल्ली : पेट्रोल व डिझेलवर सरकारने घसघशीत एका पैशाची दरकपात केल्यावर उत्साहित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी मोदिंनी घेतलेल्या या निर्णयाचा जनमानसात प्रचार करण्याचे आदेश पक्षाकडून आल्याचे त्यांनी सांगितले. आमचा पक्ष नेहमीच गोरगरिबांचा विचार करतो, कर्नाटकातल्या गरीब आमदारांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून आम्ही “दीदा उपाध्याय आमदार खरेदी योजना” तिथे लागू केली होती मात्र विघ्नसंतोषी कॉंग्रेसने ती हाणून पाडली. मात्र “न खाऊंंगा, न खाणे दुंगा, लेकीन पार्सल लेके जाने दुंगा” या आमच्या…

पुढे वाचा ..

का बदलतोय सुसू स्वामींच्या डोक्याचा आकार ..

लोकांच्या डोक्यावरील केस कमी जास्त होतात, किंवा वयानुरूप उंची वाढते आणि हाडे ठिसूळ होतात. मात्र दिल्लीतील एका उच्चविद्याविभूषित राजकारण्याच्या डोक्याचा आकारच बदलतोय, त्यांच्या चेहऱ्याची डावी बाजू हळूहळू सपाट होतीये, तर डावा गालहि गुळगुळीत झालाय. हे राजकारणी महोदय सतत सुप्रीम कोर्टात असतात, देशातील एका घराण्याच्या विरुद्ध यांच्या मनात आकस असल्याने त्यांच्या विरुद्ध सतत फुसके आरोप करून हे न्यायालयाचा वेळ वाया घालवत असतात. अशाच एका खटल्यात न्यायमूर्तींनी यांच्याविरुद्ध निकाल देत यांच्या खटल्याची कागदपत्रे यांच्याच तोंडावर फेकून मारली…

पुढे वाचा ..

आमदारांच्या महागाईबद्दल राज्यसभेत विचारणार प्रश्न : नाना स्पॉट

आमदारांच्या महागाईबद्दल राज्यसभेत विचारणार प्रश्न : नाना स्पॉट

“पेट्रोल डिझेलच्या महागाईवर सारेच बोलतात, पण शंभर कोटी देऊनही साधा एक आमदारहि गळाला लागत नाही, याबद्दल कुणीच बोलत नाही म्हणूनच मी राज्यसभेत यावर प्रश्न विचारणार आहे” असे मत आज राज्यसभा खासदार नाना स्पॉट यांनी दिल्ली येथे व्यक्त केले. “कर्नाटकात विकासाची गंगा पोहचवण्याची आम्ही हमी घेतली होती, मात्र ऐनवेळेस मशीन सेटिंग थोडीशी बिघडली त्याबद्दल मी भारत इलेक्ट्रॉनिक च्या लोकांची सकाळी मोर्निंग वॉकच्या वेळेस भेट घेतली. वॉक संपल्यावर ते अधिकारी फारच निस्तेज होऊन रस्त्याच्या कडेला झोपले होते”…

पुढे वाचा ..

कमेंट्स ला कंटाळून अखेर दामले हॉंगकॉंग ला रवाना ..

कमेंट्स ला कंटाळून अखेर दामले हॉंगकॉंग ला रवाना ..

फेसबुकवर हॉंगकॉंग, सिंगापूर, चीन येथील पेट्रोलचे दर टाकून लोकांना देशाचा विकास व्हायचा असेल तर पेट्रोल अधिकाधिक महाग व्हायला पाहिजे पटवून देणारे प्रती-महागुरू, सुपरहिट नाट्य कलाकार दामले त्यांच्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स आधी वाचून वाचून आणि मग डिलीट करुन करून दमले आहेत. त्यातच शेजारीच राहणाऱ्या कुलकर्णी साहेबांनीच दामलेंच्या दाव्यातला फोलपणा लक्षात आणून दिल्याने दामले अजूनच चिडले, त्यांचा श्वेतवर्ण फिकट गुलाबी पडला, त्यांचा तो क्रोधावतार पाहून इंद्राचे आसन डळमळीत झाले, अप्सरांनी अश्रू ढाळले, गंधर्वांनी आपली वाद्ये फोडून टाकली…..

पुढे वाचा ..

हात आमच्या सायबांचा ..

पश्चिम महाराष्ट्रात, महाराष्ट्रात किंवा देशातच काय जगातही कुठे काय घडलं कि त्यात आमच्या सायबांचा हात असल्याची दाट कुणकुण आम्हाला आधीच लागलेली असते. म्हणजे हेच बघा ना, कर्नाटकात कॉंग्रेस-जेडीएस ची आघाडी झाली, सिद्धरामयाने प्रचार केला.. शिवकुमार ने सगळी व्यवस्था केली.. गेहलोत, गुलाम नबी आझाद मंत्रीपदांच्या जागांच्या चर्चात गुंतले पण या सगळ्यात आमच्या साय्बांचाच हात असल्याच्या पोस्टी आम्ही शपथविधीच्या आधीच रेडी केल्या होत्या.. नागालंड पासून गुजरात पर्यंत आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत देशाच्या राजकारणात जयललीताचं मरण असो…

पुढे वाचा ..