संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिकेची माघार

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिकेची माघार

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद इस्राइल विरोधात तीव्र पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातल्याअमेरिकेच्या राजदूत निकी हले यांनी केला.अमेरिका या परिषदेतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘आम्ही आमच्या जबाबदारीपासून मागे हटत नाही. पण स्वार्थी आणि दांभिक असलेल्या संस्थेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही’ असे विधान त्यांनी केले. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ हे उपस्थित होते. परिषदेचे प्रमुख जेद बिन राद अल हुसैन म्हणाले, ‘अमेरिकेने मागे हटण्यापेक्षा पुढे येऊन जबाबदारी स्वीकारायला हवी.’ यामुळे अमेरिकेची…

पुढे वाचा ..

मालदीव चीनच्या विळख्यात, भारतीयांना “नो एंट्री”

मालदीव चीनच्या विळख्यात, भारतीयांना “नो एंट्री”

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मालदीव हा चिमुकला देश पूर्णपणे चीनच्या विळख्यात गेला आहे. चीनचा वाढता प्रभाव व फ्री ट्रेड एग्रीमेंट लक्षात घेता मालदीव येत्या काही काळात चीनचे बाहुले झाल्यास नवल वाटणार नाही. चीनच्या प्रभावाखाली येऊन मालदिव सरकारने भारतीयांना आता नोकरी व्हिसा देणे बंद केले आहे, मालदीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असून तेथील हॉटेल इंडस्ट्री हि मोठी आहे, दरवर्षी हजारो भारतिय मालदीवच्या हॉटेल्समध्ये नोकऱ्या मिळवत असत, यात प्रामुख्याने दक्षिण भारतीय तरुणांचा भरणा अधिक असे. मात्र मालदिवने भारतीयांना वर्क…

पुढे वाचा ..

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्द होऊ शकत नाही. पण भारताकडून गोळीबार करण्यात आला तर आम्ही प्रत्युत्तर देणार. असे विधान पाकिस्तानी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सचे महानिदेशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. तसेच अशी चेतावणी दिली आहे की, आम्ही शांत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही कमजोर आहोत. भारतीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत असताना सोमवारी पाकिस्तानी सेनेने असे नापाक विधान केले आहे. तसेच आसिफ गफूर इतकच बडबडून गप्प राहिले नाहीत, तर…

पुढे वाचा ..

अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शाळेजवळ स्फोट

अफगाणिस्तानमध्ये मुलींच्या शाळेजवळ स्फोट

काबूल : अफगाणिस्तानमधील नांगरहार येथे मंगळवारी एका मुलींच्या शाळेजवळ आयईडी (IED) स्फोट झाला आहे. अफगाण टोलो न्यूजनुसार अजूनपर्यत जिवीतहानी झाल्यासंदर्भात समजले नाहीये. गर्व्हनर अत्ताउल्लाह यांनी सांगितले आहे की, या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.  या हल्ल्यामुळे अफगानीस्तानातील असुरक्षित वातावरण पुन्हा एकदा समोर येत आहे.

पुढे वाचा ..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे चीनकडून स्वागत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचे चीनकडून स्वागत

नवी दिल्ली : चीनने आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी पालनाबाबत झालेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच दोन्ही देश दोघांमध्ये असलेल्या मतभेदांचे योग्यरित्या निराकरण करतील अशी आशा व्यक्त केली आहे. दोन्ही देशामध्ये २००३ साली शस्त्रसंधी करार झाला होता. त्यासंबंधी २९ मे रोजी दोन्ही देशाच्या महासंचालकामध्ये हाँटलाईनव्दारे भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांबद्दल  दोन्ही देशांच्या शस्त्रसंधी पालनाबाबत सहमतीवर चर्चा करण्यात आली होती. तसेच २००३ च्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्याबाबत आणि यापुढे शस्त्रसंधीचे उल्लंघन टाळण्यासंबंधीही भारत आणि पाकिस्तान सहमत…

पुढे वाचा ..

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

भारत आणि पाकिस्तान करणार शस्त्रसंधी

नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी मोहिमांबद्दल  दोन्ही देशांच्या (DGMO) महासंचालकामध्ये आज संपर्क साधला गेला. यावेळी दोन्ही देशात शस्त्रसंधी पालनाबाबत सहमती झाली आहे. हा संपर्क पाकिस्तानच्या महासंचालकाकडून काल सायंंकाळी ६ वाजता साधला गेला. याआधी दोन्ही देशामध्ये २००३ साली शस्त्रसंधी करार झाला होता. त्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्याबाबत आणि यापुढे शस्त्रसंधीचे उल्लघंन टाळण्यासंबंधीही भारत आणि पाकिस्तान सहमत झाले. भारताचे महासंचालक (डीजीएमओ) अनिल चौहाण आणि पाकिस्तानचे महासंचालक (डीजीएमओ) साहिर मिर्झा यामध्ये शस्त्रसंधी पालनाबाबत चर्चा झाली.

पुढे वाचा ..

“आयएसआय” ला हवेत मोदिच भारताचे पंतप्रधान

“आयएसआय” ला हवेत मोदिच भारताचे पंतप्रधान

“मोदी भारताचे पंतप्रधान होने हेच पाकिस्तानच्या हिताचे आहे, मोदींच्या कट्टरपंथीय भुमिकेमुळे त्यांच्या राजवटीत भारतात अस्थिरता येऊ शकते त्या दृष्टीने मोदींची पंतप्रधानपदी झालेली निवड पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारी आहे, शिवाय मोदी हार्डलाईनर असल्याने निवडणुकी आधी काश्मीरवर काही निर्णय घेऊ शकतात” असे आयएसआय च्या माजी प्रमुखांनी एका पुस्तकात म्हटले आहे. “The Spy Chronicles” या नावाने लिहिलेल्या या पुस्तकाचे लेखक पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे माजी प्रमुख दुर्रानी व भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे माजी प्रमुख ए एस दौलत…

पुढे वाचा ..

पाकिस्तानचे नागरिक बनण्यास गिलगीटच्या रहिवाशांचा विरोध

पाकिस्तानचे नागरिक बनण्यास गिलगीटच्या रहिवाशांचा विरोध

गिलगीट बाल्टीस्तान चे स्वतंत्र अस्तित्व संपवून त्यांना पाकिस्तानात एकरूप करणाऱ्या कायद्याचा प्रखर विरोध आता गिल्गीटच्या नागरिकांनी सुरु केला आहे. “या निर्णयाविरोधात प्रथमच या भागातले सर्वच राजकीय पक्ष, आमदार व सामाजिक नेते एकत्र आहे आहेत, गिल्गीटच्या मूळ रहिवाशांना विश्वासात न घेता इथल्या लोकांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणारा हा अध्यादेश असून आम्ही याविरोधात आवाज उठवणार आहोत” असे मत तेथील कायदे मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. हा अध्यादेश म्हणजे पाकिस्तानच्या इतर भागातील लोकांना आमच्या आयुष्यात धाव्लाधवल करण्याचा दिलेला…

पुढे वाचा ..

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

गील्गीट बाल्टीस्तानच्या रहिवाशांना पाकिस्तान नागरिकत्व देणार ?

अवैधरीत्या भारतापासून बळकावलेल्या गील्गीट बाल्टीस्तान या प्रांतातील नागरिकांना पाकिस्तान आता पाकिस्तानचे नागरिकत्व देणार आहे. पाकव्याप्त काश्मीर व गील्गीट बाल्टीस्तान या दोन भागातील नागरिकांना पाकिस्तानने आता पर्यंत नागरिकत्व दिलेले नव्हते, हे दोन भाग एक स्वतंत्र व स्थानिक प्रशासन असलेले प्रदेश आहेत असा आजवर आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा दावा होता. चीनच्या आर्थिक व सैनिकी पाठींब्यावर उभा राहणारा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर CPEC याच भागातून जातो.

पुढे वाचा ..

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : सोशल मीडिया नेटवर्कवर चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ न हटविल्यामुळे तसेच याबदल अन्य उपाययोजना अमंलात न आण्याने  सुप्रीम कोर्टाने सोशल नेटवर्किंग साईटसना दंड केला आहे. यामध्ये गुगलसह, फेसबुक आणि व्हाँटसअँप यांचा समावेश असून प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाचे जस्टिस मदन बी लुकर आणि उमेश ललित यांच्या खंडपीठाने १६ मे रोजी हा निर्णय दिला आहे. सोशल मीडीया साईटस वर आपेक्षार्ह व्हिडीओच्या प्रक्षेपणासंदर्भात आलेल्या अनेक आँनलाईन तक्रारीच्या आधारावरून सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा निर्णय…

पुढे वाचा ..
1 2