राज्यात पुन्हा सुरु होणार छमछम

राज्यात पुन्हा सुरु होणार छमछम

मुंबई :  मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती. नवीन अटी व नियमांनुसार पुन्हा…

पुढे वाचा ..

संभाजी महाराज राज्याभिषेकसोहळा विशेष…

संभाजी महाराज राज्याभिषेकसोहळा विशेष…

शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र, मराठा साम्राज्याचे/स्वराज्याचे दुसरे राजे, मुघल साम्राज्याला जेरीस आणणारा वाघिणीचा छावा, सिंहाचा जबडा फाडणारा वाघ, मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मर्द मराठा अशा अनेक विशेषणांनी ज्याचं नाव आदराने घेतलं जातं, ते म्हणजे “संभाजी महाराज” व तुमचे आमचे “श्री शंभूराजे”… छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ में, १६५७ ला किल्ले पुरंदर येथे झाला. वय वर्ष दोन असताना त्यांची आई सईबाई यांचे निधन झाले व पुढे त्यांचा सांभाळ जिजाऊनी केला. साम्राज्यातील राजकीय डावपेच शिकण्यासाठी त्यांना राजा…

पुढे वाचा ..

अजित दादा बोलले कि आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री हलायला लागतो- प्रवीण गायकवाड

अजित दादा बोलले कि आजचा हत्तीसारखा मुख्यमंत्री हलायला लागतो- प्रवीण गायकवाड

तुळापुर :  छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कायर्क्रमात संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार तसेच हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती. गतवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक भिमाकोरेगाव येथील दंगली मुले पोलीस प्रशासनाने विनंती करून रद्द करण्यास लावला होता. ज्यामुळे यंदा शिवप्रेमींची संख्या अधिक दिसून आली. सदर कार्यक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अजित पवारांची स्तुती करताना त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले ” अजित दादांनी फोन केल्यावर…

पुढे वाचा ..

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, लेखक, समाजसेवी सन्मानित.

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर, लेखक, समाजसेवी सन्मानित.

पुणे: महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या अमेरिकेतील मराठी माणसांच्या संस्थेद्वारे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यावर्षी चार साहित्य क्षेत्रातील व चार समाजकार्यातील असे एकूण आठ पुरस्कार दिले जाणार आहात. पुरस्कारांचा वितरण समारंभ २७ जानेवारी २०१९ रोजी,पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. अमेरिकेत स्थायिक  झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेली महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) हि संस्था दरवर्षी हा पुरस्कार समारंभ आयोजित करते यावर्षीच्या पुरस्कार समारंभाचे अतिथी ख्यातनाम सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल हे असतील. २०१८ सालच्या सोहळ्यास द वायर व हिंदूचे संपादक…

पुढे वाचा ..

मी शांतीत गनिमी कावा करणार – अजित पवार

मी शांतीत गनिमी कावा करणार – अजित पवार

तुळापुर : स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तुळापुर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या आगामी चालींबद्दल भाष्य केले. राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार  म्हणाले, “मला जे करायचं ते मी  करतो आणि जेव्हा करतो तेव्हा या कानाचे त्या कानाला कळू देत नाही. आता मी जास्त बोलणार नाही मात्र जे करायचे ते शांतीत गनिमीकावा करत राहणार आहे.” २०१९ ची सार्वत्रिक लोकसभा…

पुढे वाचा ..

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

..आणि एका रात्रीत आदिवासींची जमीन उद्योगपतींची झाली

आलनार, दांतेवाडा, (छत्तीसगड) : नक्षली समस्यांनी ग्रस्त असलेल्या आलनार या गावातील आदिवासी समाजाच्या सामुहिक मालकीची असलेली शेकडो एकर जमीन एका रात्रीत आरती स्पंज एन्ड पावर लिमिटेड या कंपनीच्या मालकीची झाली. आदिवासी वनजमीन हक्क कायद्याअन्वये आदिवासी पाड्यांच्या आजूबाजूच्या जमिनीवर स्थानिक आदिवासींची सामुहिक मालकी असते. गावातले सर्व सज्ञान नागरिक सभासद असलेल्या ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय ह्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प उभारता येत नाही. आलनार ग्रामसभेच्या ग्रामस्थांनी आरती स्पंज कंपनीला आपली वनजमीन देण्याचा विरोध केलेला असतानाही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मंजुरी मिळाल्याचे…

पुढे वाचा ..

आलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई

आलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितलेले सीबीआय निदेशक आलोक वर्मा यांना मोदींच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने पुन्हा पदमुक्त केले आहे. दोनच दिवसांपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांची हकालपट्टी असंविधानिक ठरवत त्यांना पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितले होते. आलोक वर्मा सीबीआय निदेशक असताना त्यांनी राफेल कराराच्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली होती. मोदी सरकारने त्यांना रात्री दोन वाजता निलंबित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने वर्मांना पदभार देताना त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी अट घातली होती. वर्मांनी…

पुढे वाचा ..

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य : अमर्त्य सेन

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे योग्य : अमर्त्य सेन

बाकीच्या अर्थतज्ज्ञांना वाटत असेल पण कर्जमाफीत मला काहीही चुकीचं वाटत नाही. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली येऊन त्यांची जमीन विकावी लागते, इतर उद्योगांना जसं कर्ज मिळते आणि कर्जमाफीहि मिळते तशी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असे मत नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले.

पुढे वाचा ..

आर्थिक मागास असलेल्या सवर्णांना मिळणार आरक्षण ?

आर्थिक मागास असलेल्या सवर्णांना मिळणार आरक्षण ?

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकात दणकावून मार खालेल्या भाजपाने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकानुयायी निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे. सवर्ण समाजतील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पारित करण्यात आला. वर्षाला आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या किंवा पाच एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या सवर्ण जातींच्या नागरिकांना या आरक्षणाचा लाभ घेण्याची तरतूद या प्रस्तावात केली आहे हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत पारित झाला असला तरी तो आता आधी लोकसभेत पारित करावा लागेल,…

पुढे वाचा ..

संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

संघ – भाजपच्या मुखपत्राची ‛ओबीसी’ विरोधी टिप्पणी, लोक संतप्त

कोची : संघपरिवार व भारतीय जनता पक्ष जन्मभूमी या नावाने एक मुखपत्र चालवतात, दक्षिण भारतात, प्रामुख्याने केरळ या राज्यात हे मुखपत्र प्रसिद्ध आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या जातीचा तुच्छतापूर्वक उल्लेख केल्याने हे मुखपत्र अडचणीत आले आहे. साबरीमला विवादात संघपरिवाराने पिनाराई विजयन यांच्याविरोधात एक मोठी आघाडी उघडली आहे. साबरीमला च्या अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विजयन करत असल्याने ते संघपरिवाराच्या हिटलिस्टवर आले आहेत. अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला तर राज्यभर…

पुढे वाचा ..
1 2 3 4 28