राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे निधन

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर ( वय ६७ वर्षे) यांचे आज पहाटे (गुरूवार) ह्रदय विकाराराच्या झटक्याने निधन झाले. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी मुंबईतील सोमय्या रूग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आल होत. मात्र पहाटे ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. फुंडकर यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. फुंडकर यांच्या पार्थिवावर खामगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत….

पुढे वाचा ..

“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

“अमूल” चं लक्ष ५० हजार कोटींच्या उलाढालीवर

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० टक्के जास्त वाढीचं लक्ष्य ठेवून यावर्षी अमूल उद्योग समुहाची ५० हजार कोटींची उलाढाल करण्याचा मानस आहे. “आम्ही नवीन प्रोडक्ट्स लौंच करत आहोत, सध्या यशस्वी असलेल्या उत्पादनांपैकी काहींना वरच्या श्रेणीत पुन्हा लौंच करून त्यावरून कंपनीला येणारा नफा वाढवण्यावर आमचा भर असेल, शिवाय आमच्या उत्पादनांना बाजारात अजूनही मोठी मागणी आहे, पूर्ण करण्यासाठी आम्ही गुंतवणूक वाढवणार आहोत” असे कंपनीचे अमुलचे आर. एस. सोधी यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात अमूल ची उलाढाल ४०…

पुढे वाचा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

नवी दिल्ली: करार शेती कायद्याचा नवीन मसुदा (The draft Agricultural Produce and Livestock Contract Farming and Services (promotion and facilitation) Act 2018 ) केंद्र सरकारने जाहीर केला असून या नवीन कायद्याअन्वये करार शेतीला कृषी उतोन्न बाजार समितीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. नवीन कायद्यात भूधारक व स्पोन्सर कंपनीच्या संबंधांना आधिकारिक स्वरूप दिले असून, काढणीपूर्व व पश्चात विमा व आधीच ठरवलेल्या दरात खरेदी हे या आधीच्या कायद्याची वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहे. स्पॉन्सर कंपनी शेतकऱ्याच्या जमिनीवर कुठलंहि…

पुढे वाचा ..

भातशेतीत क्रांतिकारी संशोधन करणाऱ्या संशोधकाला मदतीचा हात ..

भातशेतीत क्रांतिकारी संशोधन करणाऱ्या संशोधकाला मदतीचा हात ..

चंद्रपूर : एचमटीसह एकूण नऊ तांदळांच्या वाणांचे संशोधक म्हणून महाराष्ट्र राज्यातच नाही तर देशात प्रसिध्द असणारे चंद्रपूरमधील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे सध्या आजाराशी सामना करत आहेत. मागील चार दिवसापासून ब्रम्हपूरी येथील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २०१५ पासून ते अर्धांगवायू या आजाराने ते त्रस्त आहेत. शेतात नापिकी असल्याने त्याच्या कुंटुंबाची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यांना सध्या रूग्णलायात दाखल करण्यात आल असून उपचारासाठी पैसे नाही आहेत. सरकारकडे मदत मागून देखील आजून मदत मिळाली नाही आहे. त्यामुळे २५…

पुढे वाचा ..