शिवरायांच्या घोषणा दिल्याने शिक्षकाने केली मारहाण. बेळगावातील घटनेने द्वेष उघड

शिवरायांच्या घोषणा दिल्याने शिक्षकाने केली मारहाण. बेळगावातील घटनेने द्वेष उघड

बेळगाव : बालदिना निमित्ताने एका शाळेत घेतलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्याने एका विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. बालदिनाचे औचित्य साधून घेतलेल्या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पोवाडा सादर केला. पोवाडा ऐकून स्फुरण चढलेल्या विद्यार्थ्यांने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “धर्मवीर छत्रपती संभाजीराजे की जय” अशा घोषणा दिल्या. सदरील घोषणांचा मराठी द्वेष्ट्या शिक्षकाला राग आल्याने त्याने जागीच बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. याघटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांना…

पुढे वाचा ..

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांना नोटीस. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

दिल्ली: नोटबंदी व त्यानंतर ढासळलेली अर्थव्यवस्था कर्जबुडवे उद्योजक यामुळे अडचणीत आलेली रिजर्व बँक आज पुन्हा चर्चेचा विषय आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना केंद्रीय माहिती आयोगाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचे पालन न केल्याने त्यांना ही नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलेले व ती बुडवलेल्या कर्जदारांची यादी जाहीर करण्यात यावी. या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे साहस गव्हर्नर उर्जित पटेलांनी केले होते.त्यामुळे आज त्यांना ही नोटीस बजावण्यात…

पुढे वाचा ..

२ महिन्यांनी मिळाला जमीन, मुख्यमंत्र्यांची महापुजा रद्द झाल्यामुळे केली होती अटक

२ महिन्यांनी मिळाला जमीन, मुख्यमंत्र्यांची महापुजा रद्द झाल्यामुळे केली होती अटक

पंढरपूर :  सकल मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अडीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आषाढी  एकादशीच्या शासकीय महापुजेला विरोध करण्यात आला होता. वाढत्या विरोधमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजा रद्द करावी लागली होती.   यादरम्यान वारीत    साप सोडून गोंधळ निर्माण करणे व शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांचा असून वारीत जीवित हानी टाळण्यासाठी मी पूजेला न    जाण्याचा निर्णय घेतला आहे असे  देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यादरम्यान सकल मराठा मोर्चाचे समनवयक रामभाऊ गायकवाड यांना अटक करण्यात आली…

पुढे वाचा ..

कलम ३७७ रद्द केल्यास भेदभाव नष्ट होईल : सुप्रीम कोर्ट

कलम ३७७ रद्द केल्यास भेदभाव नष्ट होईल : सुप्रीम कोर्ट

समलैंगिक संबधांना गुन्हा ठरवणारा कलम ३७७ रद्द झाल्यास एलजीबीटीक्यू समाजाविरोधात असणारा भेदभाव नष्ट होईल असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. आयपीसीच्या कलम ३७७ च्या वैधतेची छाननी करण्याचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने १५८ वर्षांच्या दंडात्मक कायद्याची संवैधानिक वैधता पाळल्याचा आरोप असलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जनतेचे मत लक्षात घेऊन संवैधानिक मार्गाने निर्णय घेतला जाणार आहे. एका याचिकाकर्त्याची बाजू मांडताना वकील अशोक देसाई यांनी ‘समलैंगिकता हा विषय भारतीय संस्कृतीत…

पुढे वाचा ..

सनी लिओनी, हुमा कुरेशी ‘यामुळे’ गोत्यात ?

सनी लिओनी, हुमा कुरेशी ‘यामुळे’ गोत्यात ?

बॉलीवूड : बिटकॉईन प्रकरणात  राज कुंद्रानंतर इतर प्रख्यात अभिनेत्री देखील अडचणीत येण्याची  चिन्हे दिसत आहेत. सनी लिओनी, हुमा कुरेशी, झरीन खान, नेहा धुपिया, सोनल चौहान यांनी बीटकॉईनचं प्रमोशन केले असल्याचा आरोप आहे. सध्या कोठडीत असलेला आरोपी अमित भारद्वाजच्या केलेल्या  चौकशीत सिनेसृष्टीतील ही सर्व  नाव पुढे आली असल्याचे मानले जात आहे. या गंभीर आर्थिक घोटाळ्यात, ED म्हणजेच  enforcement directorate ने शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रांची देखील सुमारे  ८ तास कसून  चौकशी केल्यानंतर बॉलीवूड मधे खळबळ उडाली…

पुढे वाचा ..

एमपीएससी परीक्षेत रोहितकुमार राज्यात प्रथम

एमपीएससी परीक्षेत रोहितकुमार राज्यात प्रथम

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल जाहिर झाला. परिक्षेत पुण्यातील रोहितकुमार राजपूत हा राज्यातून प्रथम आला आहे. तर मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारने २०१७ मध्ये उपजिल्हाधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, उप पोलिस अधिक्षक, विक्रीकर सहाय्यक आयुक्त आणि इतर पदासाठी परीक्षा घेतली होती. राज्यात प्रथम आलेल्या रोहितकुमारला ५९९ गुण मिळाले. तर सुधीर पाटील (५७२ गुण), सोपान टोपे (५७१ गुण) यांनी अनुक्रमे व्दितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. दत्तू शेवाळे ५६६ गुणांसह ओबीसी प्रवर्गातून…

पुढे वाचा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

केंद्र सरकारने जाहीर केला करार शेती कायद्याचा नवीन मसुदा ..

नवी दिल्ली: करार शेती कायद्याचा नवीन मसुदा (The draft Agricultural Produce and Livestock Contract Farming and Services (promotion and facilitation) Act 2018 ) केंद्र सरकारने जाहीर केला असून या नवीन कायद्याअन्वये करार शेतीला कृषी उतोन्न बाजार समितीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. नवीन कायद्यात भूधारक व स्पोन्सर कंपनीच्या संबंधांना आधिकारिक स्वरूप दिले असून, काढणीपूर्व व पश्चात विमा व आधीच ठरवलेल्या दरात खरेदी हे या आधीच्या कायद्याची वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहे. स्पॉन्सर कंपनी शेतकऱ्याच्या जमिनीवर कुठलंहि…

पुढे वाचा ..

भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी?

भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी?

भारतीय रेल्वेतून कोणत्या गोष्टींची होते चोरी? नवी दिल्ली : शौचालयातील मगापासून ते छतावरील पंखा, बेडवरील बॅल्केट अशा रेल्वेतील वस्तू चोरांच्या लक्ष्य ठरल्या आहेत. यावस्तूबरोबर शौचालयातील शावर, खिडकीचे लोखंडी गज, रेल्वेचे मार्गावरील लोखंड अशी एकूण २.९७ करोड रूपयांचे मूल्य असलेली चोरीची मालमत्ता साल २०१७-१८ दरम्यान रेल्वे सुरक्षा दल पोलीसांनी रिकव्हर केली आहे. यावर्षी जप्त केलेल्या चोरीच्या मालमत्तेची किमत ही साल २०१६-१७ पेक्षा डब्बल आहे. २०१६-१७ यावर्षी रेल्वे सुरक्षा दल पोलीसांनी १.५८ करोड रूपयांची चोरीची मालमत्ता रिकव्हर केली होती.  तसेच यादरम्यान ५,४५८…

पुढे वाचा ..

24 तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास कॅन्सलेशन फी लागणार नाही

24 तासांच्या आत तिकीट कॅन्सल केल्यास कॅन्सलेशन फी लागणार नाही

नवी दिल्ली : विमान तिकीट बुक केल्यानंतर 24 तासांच्या आत ते तिकीट कँन्सल केल्यास कॅन्सलेशन फी प्रवांशाकडून आकारण्यात येणार नाही, तसेच  विमान कंपनीच्या चुकीमुळे उड्डाणास विलंब झाला तर विमान कंपन्यांना प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे, अशी घोषणा मंगळवारी भारतीय नागरी उड्डाण मंत्री यांनी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे नवीन नियम लागू होतील. नवीन नियमांनुसार विमान कंपन्यांच्या चुकीमुळे विमान कॅन्सल झाल्यास विमानकंपन्यांना विमान तिकीटांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील. तसे न केल्यास दुसऱ्या विमानच्या तिकीटाची व्यवस्था करावी…

पुढे वाचा ..

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

गुगलसह फेसबुक, व्हाँटसअँपला एक लाखाचा दंड, चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ काढण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : सोशल मीडिया नेटवर्कवर चाईल्ड प्रोर्नोग्राफी आणि रेप व्हिडीओ न हटविल्यामुळे तसेच याबदल अन्य उपाययोजना अमंलात न आण्याने  सुप्रीम कोर्टाने सोशल नेटवर्किंग साईटसना दंड केला आहे. यामध्ये गुगलसह, फेसबुक आणि व्हाँटसअँप यांचा समावेश असून प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाचे जस्टिस मदन बी लुकर आणि उमेश ललित यांच्या खंडपीठाने १६ मे रोजी हा निर्णय दिला आहे. सोशल मीडीया साईटस वर आपेक्षार्ह व्हिडीओच्या प्रक्षेपणासंदर्भात आलेल्या अनेक आँनलाईन तक्रारीच्या आधारावरून सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा निर्णय…

पुढे वाचा ..
1 2