आलोक वर्मा पुन्हा पदमुक्त, मोदींची कारवाई

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितलेले सीबीआय निदेशक आलोक वर्मा यांना मोदींच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने पुन्हा पदमुक्त केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मांची हकालपट्टी असंविधानिक ठरवत त्यांना पुन्हा पदभार स्वीकारायला सांगितले होते. आलोक वर्मा सीबीआय निदेशक असताना त्यांनी राफेल कराराच्या कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली होती. मोदी सरकारने त्यांना रात्री दोन वाजता निलंबित केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने वर्मांना पदभार देताना त्यांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी अट घातली होती. वर्मांनी पदभार स्वीकारल्या बरोबर ते अनुपस्थित असताना केलेल्या बदल्या रद्द ठरवल्या होत्या.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment